Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

गेवराईतील ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ ला बागपिंपळगावातून शुभारंभ, पहिल्याच दिवशी ३५० जणांची नेत्र तपासणी

युवानेते बाळासाहेब मस्के यांचा पुढाकार ; पत्रकार बालाजी मारगुडे, भागवत तावरे, सुनील डोंगरे, संग्राम धन्वे यांची उपस्थिती

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
18 August 2023
in बीड, महाराष्ट्र
0
गेवराईतील ‘गाव तेथे आरोग्य शिबीर’ ला बागपिंपळगावातून शुभारंभ, पहिल्याच दिवशी ३५० जणांची नेत्र तपासणी

गेवराई : मतदारसंघात भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पुढाकाराने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत गाव तेथे आरोग्य शिबीर राबविले जात आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर नागरिकांची मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत. दरम्यान या अभियानाचा शुभारंभ दै. कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दै. लोकाशाचे आवृत्ती प्रमुख भागवत तावरे, दै.पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, मराठी महाराष्ट्रचे संपादक संग्राम धन्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तालुक्यातील बागपिंपळगाव येथे शुक्रवार रोजी करण्यात आला. या शिबीराच्या पहिल्याच दिवशी बागपिंपळगाव व राजपिंप्री येथील तब्बल ३५० जणांची नेत्र तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली.बीआरएस पक्षाचे युवा नेते तथा बीएम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के व गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या समन्वयक मयुरीताई खेडकर-मस्के यांच्या पुढाकारातून व एच.व्ही. देसाई आय हाँस्पिटल व मानव कल्याण हितवादी सेवाभावी संस्था मुंबई यांच्या संयुक्त मोफत आरोग्य यज्ञ राबविण्यात येत आहे. गेवराई मतदारसंघात गाव तेथे आरोग्य शिबीर राबवून तब्बल १ लाख नेत्र तपासणी व ११ हजार मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प बाळासाहेब मस्के यांनी केलेला आहे.

ग्रामीण भागामध्ये डॉ. योगेश क्षीरसागरांची पॉवरफुल एन्ट्री

पोलिस अधिक्षक पंकज कुमावत धडाकेबाज कारवाई;२७ लाखांचा गांजा केला जप्त

मराठा आरक्षणासंदर्भात भुमिकेला आणि बीड जिल्हा बंदला डॉ.योगेश क्षीरसागर राजेश्वर चव्हाण यांचा पाठिंबा 

दरम्यान शुक्रवार दि.१८ आँगस्ट रोजी सकाळी बागपिंपळगाव येथून या आरोग्य शिबीराचा शुभारंभ करण्यात दै. कार्यारंभ चे कार्यकारी संपादक बालाजी मारगुडे, दै. लोकाशाचे आवृत्ती प्रमुख भागवत तावरे, दै.पुण्यभूमीचे कार्यकारी संपादक सुनील डोंगरे, मराठी महाराष्ट्रचे संपादक संग्राम धन्वे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.दरम्यान नागरिकांची मोफत नेत्र तपासणी शिबिरात केली जात आहे. यानंतर आवश्यक त्या रुग्णांवर नंतर टप्याटप्याने मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथील एच.व्ही. देसाई आय हाँस्पिटल येथे करण्यात येणार आहेत. तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड या आरोग्य शिबिरातून नागरिकांना दिली जाणार आहेत. त्याचबरोबर बंद पडलेली संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेचा लाभ नागरिकांना दिला जाणार आहे, पी.एम. किसान सन्मान निधी योजनेची नविन नोंदणी देखील यामध्ये नागरिकांना करुन दिली जात आहे. दरम्यान शिबीराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती.

शिबीराच्या पहिल्याच दिवशी बागपिंपळगाव, राजपिंप्री येथील ३५० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर शिबीरात गोरगरीब रुग्णांवर उपचार होत असल्याने आयोजक बाळासाहेब मस्के, मयुरीताई खेडकर-मस्के यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी बीआरएसचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

Previous Post

आ.किशोर पाटिल यांच्यावर गुन्हा दाखल करा; पत्रकार संघटनांची राज्यपालांकडे मागणी

Next Post

अमरसिंह पंडित यांचं शरद पवार यांना उत्तर

Next Post
अमरसिंह पंडित यांचं शरद पवार यांना उत्तर

अमरसिंह पंडित यांचं शरद पवार यांना उत्तर

शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत

शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134