बीड : शहरातील मध्यवर्ती भागात आलिशान दवाखाना थाटत रुग्णांची फसवणूक करणाऱ्या डॉक्टरला आता पोलिसांनी अटक केली आहे… आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत हा गैरप्रकार समोर आला.
बीड जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा अक्षरशा सुळसुळाट झाला असून अनेक ठिकाणी बोगस डिग्री च्या साह्याने दवाखाने चालवले जात असल्याचा प्रकार आता समोर येऊ लागला आहे… बीड जिल्ह्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसापूर्वी बैठक घेतली होती त्यानंतर आता आरोग्य विभागाकडून मोहीम राबवली जात आहे.. दोन दिवसांपूर्वीच के देते एक बोगस डॉक्टर सेवा देत असल्याचे समोर आले होते.. त्यानंतर आज आरोग्य विभागाने बीड शहरातील संत भगवान बाबा चौक परिसरामध्ये असलेल्या संजीवनी नस क्लिनिक मध्ये कारवाई करत या डॉक्टरचा भांडाखोड केला… ऋषिकेश कानडे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून त्याच्याकडे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतेही शिक्षण नसताना तो बोगस डिग्री च्या साह्याने रुग्णांवर उपचार करत होता. या गंभीर प्रकाराचे दखल घेत आता त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाणार असून सध्या त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
















