Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
19 August 2023
in Breaking News
0
शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत

 

यवतमाळ : शुक्रवारी दि. १८ यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना एका भावनिक क्षणाला सामोरे जावे लागले. मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबापैकी एका शेतकऱ्याच्या पोटी चार मुली आहेत, या चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड व नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती त्यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी यवतमाळ मध्ये आले होते. धनंजय मुंडे यांच्याकडे आपली व्यथा मांडत असताना त्या महिला भगिनीला रडू कोसळले.

शेतकरी नवरा तर गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करणार, असा प्रश्न विचारत ती भगिनी धाय मोकलून रडू लागली. त्यात शासनाची मिळणारी मदतही अद्याप मिळाली नसल्याचे तिने मुंडेंना सांगितले.

त्याबरोबर धनंजय मुंडे यांनी उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांना फोन लावून या दोनही कुटुंबांना तात्काळ अर्थसहाय्यची मदत देण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर एकाच कुटुंबातील चार मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

राज्याचे कृषीमंत्री म्हणून काम करत असताना धनंजय मुंडे यांच्या समोर असा प्रसंग पहिल्यांदाच आला असला तरी, मागच्या काळात अशा अनेक प्रसंगांना त्यांनी अत्यंत संवेदनशील पद्धतीने हाताळलेले आहे.

दरम्यान आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत तर कुटुंबापुढील प्रश्न आणखी वाढतात. आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा विचार करून कुठल्याही शेतकरी बांधवाने आत्महत्या करण्याचा विचार मनात आणू नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास किंवा शेतकरी बांधवांना कोणतीही मदत लागल्यास आपल्या घराचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असे भावनिक आवाहन या प्रसंगाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावरून केले आहे.

Tags: कृषिमंत्रीधनंजय मुंडेमहाराष्ट्र शासनयवतमाळ
Previous Post

अमरसिंह पंडित यांचं शरद पवार यांना उत्तर

Next Post

परळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्यापासून प्रभू वैद्यनाथ मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांना मोफत प्रसाद

Next Post
परळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्यापासून प्रभू वैद्यनाथ मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांना मोफत प्रसाद

परळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्यापासून प्रभू वैद्यनाथ मंदिरात प्रत्येक श्रावण सोमवारी भाविकांना मोफत प्रसाद

शरद पवारांनी टाकला कोल्हापूरात मोठा डाव; पहा काय आहे खेळी

शरद पवारांनी टाकला कोल्हापूरात मोठा डाव; पहा काय आहे खेळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134