Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

शेतकऱ्यांना दिलासा कृषीमंत्री धनंजय मुंडेंची दिल्ली वारी सफल!

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
22 August 2023
in शेत-शिवार
0
शेतकऱ्यांना दिलासा कृषीमंत्री धनंजय मुंडेंची दिल्ली वारी सफल!

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कांदा प्रश्नी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकार नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटल या दराने आजपासूनच खरेदी करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, लासलगाव आदी केंद्रांवरून हा कांदा खरेदी करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास दोन लाख मेट्रिक टन पेक्षा अधिक कांदा देखील खरेदी केला जाईल. या खरेदी ची सुरुवात आज १२:०० वाजल्यापासूनच सुरू करण्यात येत असल्याची घोषणा पियुष गोयल यांनी केली आहे.

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

कृषी कन्यांनी केले शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची राजस्थान मधील किसान संमेलनास ऑनलाइन उपस्थिती

कांदा निर्यातीवर ४०% निर्यात शुल्क लावल्यानंतर कांद्याचे भाव पडतील की काय या भीतीने महाराष्ट्रातील पेटलेल्या कांदा प्रश्नावर आज राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली, ही दिल्ली वारी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत सफल ठरली आहे.

आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचेही श्री पियुष गोयल यांना फोन आले, त्यांनी देखील राज्यातील कांदा नाफेड व एनसीसीएफ मार्फत खरेदी केला जावा, याबाबत आग्रही विनंती केली, अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

दरम्यान केंद्र व राज्य सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यापूर्वी देखील नाफेड व एनसीसीएफ मार्फत राज्यातील तीन लाख मेट्रिक टन कांदा केंद्र सरकारने खरेदी केलेला आहे. त्याचबरोबर आता आणखी दोन लाख मेट्रिक टन कांदा २४१० प्रतिक्विंटल भावाने खरेदी करण्यात येत असून कांद्याचे भाव उत्पादक व खरेदीदार या दोघांच्या दृष्टीने संतुलित राहतील, यासाठी सरकार प्रयत्नशील राहील तसेच कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे असेही यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले.

केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी तात्काळ राज्यातील कांदा खरेदी करण्याबाबत घोषणा केली, तसेच २४१० रुपये प्रति क्विंटलचा भाव देऊन कांदा खरेदीस तात्काळ सुरुवात देखील केली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे देखील दूरध्वनीवरून सातत्याने माझ्या व गोयल साहेबांच्या संपर्कात होते तसेच कांदा खरेदीबाबत आग्रही होते. केंद्र सरकारने निर्यात शुल्काबाबत पुनर्विचार करावा अशी विनंती देखील आम्ही केली आहे. मात्र दरम्यानच्या काळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, या दृष्टीने तात्काळ खरेदीचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सर्वांचेच मी मनापासून आभार मानतो, अशी प्रतिक्रिया बैठकीनंतर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Tags: कांदा उत्पादककृषिमंत्रीकेंद्रीय मंत्रीधनंजय मुंडेपियुष गोयलमंत्रीमहाराष्ट्रशेतकरी
Previous Post

अंगणवाडी शिक्षिकेचा नवऱ्याने केला खून

Next Post

योगेश क्षीरसागर यांचा प्रवेश आणि आज पुन्हा क्षीरसागर यांची नवी भूमिका

Next Post
योगेश क्षीरसागर यांचा प्रवेश आणि आज पुन्हा क्षीरसागर यांची नवी भूमिका

योगेश क्षीरसागर यांचा प्रवेश आणि आज पुन्हा क्षीरसागर यांची नवी भूमिका

सदृश परिस्थितीमुळे मराठवाड्यातील सर्व तालुक्यांचा कंटीन्जन्सी प्लॅन आठ दिवसात तयार करा – मुंडेंचे निर्देश

सदृश परिस्थितीमुळे मराठवाड्यातील सर्व तालुक्यांचा कंटीन्जन्सी प्लॅन आठ दिवसात तयार करा - मुंडेंचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134