Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आली मात्र झाला दुर्दैवी अंत

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
19 June 2023
in Breaking News, ताज्या बातम्या
0
MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आली मात्र झाला दुर्दैवी अंत

पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या २६ वर्षीय दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळालाय. पुण्यात सत्कार स्वीकारायला गेल्यानंतर दर्शना बेपत्ता होती, असे तिच्या वडिलांनी पोलिसांच्या जबाबात सांगितलेय. दर्शनासोबत तिचा मित्रही बेपत्ता असल्याचे समजतेय.

स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून (MPSC) राज्यातून तिसऱ्या क्रमांकाने पास होत फॉरेस्ट ऑफिसर (RFO) पोस्ट काढलेल्या २६ वर्षीय तरुणीचा राजगड किल्याच्या पायथ्याला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्तू पवार (वय २६) असे या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना ही मुळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होती. काही दिवस पुण्यात देखील तिने क्लास केले होते. त्यानंतर ती गावी जावून सेल्फ स्टडी करत होती. तिने नुकतेच स्पर्धा परिक्षेतून फॉरेस्ट ऑफिसर म्हणून राज्यातून तिसऱ्या क्रमांकाचे यश मिळवले होते.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

९ तारखेला पुण्यातील ऐका अकॅडमीच्या वतिने तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्ताने ती पुण्यात आली होती. तिच्या नर्हे येथील एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगड किल्याला ट्रेकींगसाठी जात असल्याचे तिने मैत्रीणीला सांगितले होते. तसेच, कुटूंबाला देखील तिने याबाबत कल्पाना दिली होती.

तिच्या एका मित्रासोबत ती गेली होती त्यानंतर १२ जून ला दर्शना गेल्यानंतर तिचा फोन बंद झाला. फोन बंद झाल्याने तीन दिवस तिच्या कुटूंबाने शोध घेतला. पण, ती सापडली नाही. यानंतर दर्शनाच्या कुटूंबाने सिंहगड रोड पोलिसांत मिसिंग तक्रार दाखल केली होती. सिंहगड पोलिसांनी लागलीच तरुणीचा व त्या तरुणाचा शोध सुरू केला. त्याचदरम्यान दर्शनासोबत गेलेला तरूण देखील बेपत्ता आल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच्या कुटूंबाने याबाबत वारजे माळवाडी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यानंतर या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला. १२ जूनच्या दुपारनंतर या दोघांचे मोबाईल बंद झाले होते. शेवटचे लोकेशन वेल्हा येथील आल्याने त्यानूसार पोलिसांकडून शोध सुरू होता.

आज राजगड किल्ल्याच्या पायथ्याला झाडांमध्ये एका तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. वेल्हा पोलिसांनी लागलीच धाव घेत तपास सुरू केला. तिचा मोबाईल इतर वस्तू त्याठिकाणी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यावरून नातेवाईकांशी संपर्क साधला. कुटूंबाने धाव घेऊन तिची ओळख पटवली. यादरम्यान, प्राण्यांनी मृतदेहाशी छेडछाड केलेली असल्याचेही समोर आले. तर दुसरीकडे दर्शनाचा मित्र देखील बेपत्ता असून, त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे नेमक घडले काय, याबाबत पोलीस आता युद्धपातळीवर तपास करत आहेत. सिंहगड रोड, वारजे आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा एकत्रित तपास केला जात आहे

Tags: MPSCराज्यात तिसरी आली दर्शनारायगडाच्या पायथ्याला आढळला मृतदेह
Previous Post

मनीषा कायंदे यांची ठाकरें गटातून हकालपट्टी

Next Post

राज्यातील ४ हजार ४६४ तलाठी भरती होणार; कधी होणार भरती पहा ऐका क्लिकवर

Next Post
राज्यातील ४ हजार ४६४ तलाठी भरती होणार; कधी होणार भरती पहा ऐका क्लिकवर

राज्यातील ४ हजार ४६४ तलाठी भरती होणार; कधी होणार भरती पहा ऐका क्लिकवर

२३ जून ला देशातील सर्वात मोठी बैठक, bjp ला रोखण्यासाठी मोठी आखणी

२३ जून ला देशातील सर्वात मोठी बैठक, bjp ला रोखण्यासाठी मोठी आखणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134