मुंबई : शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत महिला आघाडीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक प्रभावी, संघटित आणि परिणामकारक पद्धतीने कसे राबवता येईल याबाबत डॉ.निलमताई गोऱ्हे यांनी सखोल मार्गदर्शन केले. तळागाळातील महिलांपर्यंत शासकीय योजना पोहोचवण्यासाठी पक्षातर्फे ज्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा प्रभावीपणे वापर करून अधिकाधिक लोकांपर्यंत शिवसेना पक्ष आणि विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करण्याचे आवाहन केले.
‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी‘ सारख्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती गरजू महिलांपर्यंत आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मा. रामहरी राऊत यांनी मार्गदर्शन केले. ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ आणि SIR (Special Intensive Revision) प्रक्रियेबाबत शेखर परदेशी यांनी BLA आणि BLO यांच्या काम करण्याच्या पद्धती आणि धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षतर्फे सर्व सामान्य नागरिकांना कोणत्या योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळवून देत येईल आणि यातून शिवसेनेशी माणसे कशी जोडली जातील याबद्दल मार्गदर्शन केले.

या प्रसंगी शिवसेना उपनेत्या कला शिंदे, महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य अँड. संगिता ताई चव्हाण, नगरसेविका संध्या दोशी, दीक्षा कारकर तसेच बीड, धाराशिव, मुंबई व राज्यातील अनेक महिला पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.















