Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची राजस्थान मधील किसान संमेलनास ऑनलाइन उपस्थिती

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
27 July 2023
in महाराष्ट्र, शेत-शिवार
0
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची राजस्थान मधील किसान संमेलनास ऑनलाइन उपस्थिती

 

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थान येथील सीकर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित किसान संमेलनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे देशभरातील साडे आठ कोटी लाभार्थी शेतकऱ्याना एका क्लिकवर वितरण करण्यात आले. याव्दारे महाराष्ट्रातील तब्बल 85 लाख 66 हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटींचा चौदावा हप्ता वितरित करण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी- मुख्यमंत्र्यांचे आवाहन

आहेर वडगांव गावात कृषिकन्यांनी राबवली पशु लसीकरण मोहीम

कृषी कन्यांनी केले शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवडीचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

सीकर राजस्थान येथे पार पडलेल्या या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान येथून ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, दादाजी भुसे यांचे स्वागत करण्यात आले, तसेच शासनाच्या वतीने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दरम्यान कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, जिल्हा – तालुका कृषी कार्यालय, तसेच गावांमध्ये अशा राज्यभरात 12980 ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले व याद्वारे राज्यातील सुमारे साडे पाच लाख शेतकऱ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला.

पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाढीव आणखी 6 हजार रुपये अर्थसहाय्य वर्षाला मिळावे यादृष्टीने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून, या योजनेच्या अंमलबजावणीला देखील लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली , तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.

Previous Post

यासाठीच स्थानिक गुन्हे शाखेचा प्रमुख व्हायचे असते का?

Next Post

भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.

Next Post
भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.

भारतरत्न डॉ.ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथी निमित्त तुलसी कॉलेज मध्ये अभिवादन.

…तर महाराष्ट्र बोगस नोकरदारांचे राज्य म्हणून ओळखले जाईल

...तर महाराष्ट्र बोगस नोकरदारांचे राज्य म्हणून ओळखले जाईल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134