Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

सरकारसोबत राष्ट्रवादी म्हणून आलोत, महाराष्ट्राच्या जनतेची कामे करून दाखवू

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
5 July 2023
in Breaking News, महाराष्ट्र, मुंबई
0
सरकारसोबत राष्ट्रवादी म्हणून आलोत, महाराष्ट्राच्या जनतेची कामे करून दाखवू

मुंबई : आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे दि. ५ जुलै रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

मी माझ्या कौटुंबिक वारशाचे राजकारण बाजूला ठेऊन पवार साहेबांच्या सान्निध्यात अजित दादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलो. घरात फूट पडणे, पक्षात फूट पडणे, त्यातून होणाऱ्या मानसिक वेदना यातून मी स्वतः याआधी गेलो आहे. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. मात्र आमच्यावर ही वेळ का आली, याचाही विचार केला गेला पाहिजे.

अमोल खुने यांची सडकून टीका होताच मनोज जरांगे यांच्यावर भेट देण्याची नामुष्की

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मला आयुष्यात मोठी संधी अजित दादांनी दिली, त्यांच्याच कडे पाहून मी पक्षात आलो, दादांना वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अनेक वेळा अन्याय सहन करावा लागला. साहेबांनी टाकलेल्या तथाकथित ‘गुगली’ यशस्वी करण्यासाठी अनेकवेळा दादांना पुढे केले गेले, त्यातून त्यांना नाहक बदनामी सहन करावी लागली, हेही आता सहन शिलतेच्या पलीकडे गेले आहे, असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. यावेळी दुपारचे भाजपसोबत स्थापन झालेले सरकार, ही देखील एक गुगली नाही ना? असा मिश्किल सवालही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

शरदचंद्र पवार साहेब हेच आमचे दैवत, आमचे विठ्ठल आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेबांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमच्या विठ्ठलाला तीन विशीष्ट बडव्यांनी घेतलं आहे, त्यामुळे विठ्ठल आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होत गेला आणि त्याचा त्रास दिवसरात्र काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला होतो आहे, हे कुठंतरी थांबावं म्हणून आम्ही हे पाऊल उचललं, असंही धनंजय मुंडे म्हणाले. दरम्यान ‘ते’ तीन बडवे कोण, याबाबत नाव घेणे मात्र मुंडेंनी टाळले.

आम्ही भाजपसोबत सत्तेत सामील झालो असलो तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणूनच सत्तेत सहभागी झालो आहोत. आपापल्या मतदारसंघात, जिल्ह्यात आणि राज्यातल्या जनतेला निवडणुकांमध्ये दिलेले शब्द पूर्ण करण्यासाठी, जनतेची कामे करण्यासाठी आम्ही या सत्तेत सहभागी झालोत, असंही धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खा.प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, धर्मराव बाबा आत्राम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सौ.रुपालीताई चाकणकर, युवक आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांसह पक्षाचे अनेक आमदार, माजी आमदार, विविध जिल्ह्याचे अध्यक्ष, विविध आघाडीचे व फ्रंटल सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अजित पवारधनंजय मुंडेमुंबई मेळावाशरद पवार
Previous Post

खा.अमोल कोल्हे यांचा टोकाचा निर्णय; राष्ट्रवादीला मोठा धक्का

Next Post

रोटरी क्लब सिटीच्या अध्यक्षपदी गणेश मैड, तर सचिपदी ईश्वर मुथा यांची नियुक्ती

Next Post
रोटरी क्लब सिटीच्या अध्यक्षपदी गणेश मैड, तर सचिपदी ईश्वर मुथा यांची नियुक्ती

रोटरी क्लब सिटीच्या अध्यक्षपदी गणेश मैड, तर सचिपदी ईश्वर मुथा यांची नियुक्ती

मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी

मंत्री धनंजय मुंडे यांना जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134