बीड : केज तालुक्यातील देवगाव येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. सकाळी प्रतिमेला अभिवादन करून जागतिक पंचरंगीध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत बापू मुंडे, गावच्या प्रथम नागरिक रूपालीताई मुंडे, माजी सरपंच अतुल दादा मुंडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मुरकुटे, ग्रामपंचायत सदस्य छंदर मुरकुटे, सिध्देश्वर मुरकुटे, पांडुरंग मुंडे, राजेंद्र मुरकुटे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मपालसिंहराजे कांबळे यांनी केले.
समितीचे अध्यक्ष डॉ. शरद गायकवाड, संतोष कांबळे,बंडू कांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कांबळे,चिवळा गायकवाड, अर्जून गायकवाड,बाळू कांबळे, नारायण गायकवाड,राणू कांबळे,अरूण कांबळे, दादाराव गायकवाड, लताबाई कांबळे, गयाबाई गायकवाड, कुंदा गायकवाड,सिमा कांबळे, संगिता कांबळे, प्रियांकाताई गायकवाड, रंजना गायकवाड, तसेच मोठ्या प्रमाणात बहुजन समाज उपस्थित होता.
सायंकाळी मिरवणुकीत जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे यांच्या हस्ते भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरूवात करण्यात आली.यावेळी रत्नमाला ताई मुंडे, अतुल दादा मुंडे, ॲड नवनाथ मुंडे, माजी उपसरपंच विठ्ठल मुंडे, आकाश मुरकुटे, धनंजय मुंडे, रामेश्वर नागरगोजे, कालिदास मुरकुटे, तसेच गावातील सर्व तरूण युवक सहभागी झाले होते.
जयंती उत्सव शांततेत व्हावा यासाठी चिवळा गायकवाड, गब्बर गायकवाड, अर्जून गायकवाड,अरूण कांबळे, नवनाथ गायकवाड, बापराव गायकवाड, संतोष कांबळे, संदिप कांबळे, प्रथमेश कांबळे, दत्ता गायकवाड, यांनी अथक परिश्रम घेतले.तसेच संजय कांबळे, विलास कांबळे, बप्पा गायकवाड, विकास कांबळे, अंकुश गायकवाड, पोपट कांबळे यांनीही कार्यक्रमासाठी योगदान दिले, या जयंती उत्सवासाठी मोठ्या संख्येने भीम अनुयायी उपस्थित होते.