बीड : बीड, शिरूर कासार तालुक्यातील वंचित राहिलेल्या सर्वच मंडळांना अग्रीम पिकविमा मिळणार आहे, याबाबत कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी आश्वस्त केले आहे. या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. याबाबत युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून त्यांनी कृषिमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्यासह राज्य शासनाचे आभार मानले आहेत.
बीड तालुक्यातील पाली, म्हाळस जवळा, नाळवंडी आणि शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी, पाडळी, खोकरमोहा या महसूल मंडळात खरीप हंगामातील मूग, सोयाबीन, उडीद, कपाशी, तूर ही पिके पूर्णतः जळून गेली होती. तरी देखील जिल्हा प्रशासनाने या महसूल मंडळांना पहिल्या टप्प्यात अग्रीम लागू करताना डावलले होते. त्यावेळी युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी शेतकर्यांची बाजू घेत बीडच्या तहसीलदारांनी भेट घेऊन तर शिरूर कासारच्या तहसीलदारांना पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेऊन तहसील प्रशासनाने तातडीने फेरसर्व्हेक्षण करण्याचे निर्देश दिले होते. तसेच, विमा प्रश्नी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना देखील निवेदन दिले होते. त्यावर ना.मुंडे यांनी बीड मतदारसंघातील शेतकर्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचा शब्द दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पाळत बीड तालुक्यातील पाली, म्हाळस जवळा, नाळवंडी आणि शिरूर कासार तालुक्यातील खालापुरी, पाडळी, खोकरमोहा या महसूल मंडळांना अग्रीम पिकविमा लागू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार हा निर्णय होत असून शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या निर्णयाबद्दल युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह शासनाचे आभार मानले आहेत.
डॉ.योगेश क्षीरसागरांच्या पाठपुराव्याला यश
बीड मतदारसंघातील शेतकर्यांना डावलण्यात आल्यानंतर डॉ.क्षीरसागर यांनी शेतकर्यांची बाजू घेत बीडच्या तहसीलदारांनी भेट घेऊन तर शिरूर कासारच्या तहसीलदारांना पत्र देऊन योग्य कार्यवाही करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन देऊन अग्रीम पिकविमा देण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून बीड मतदारसंघातील वगळलेल्या सर्वच महसूल मंडळांना अग्रीम पिकविमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.