वाशिम : जिल्हा व सत्र न्यायालयाने ऐका निर्णयाने जनतेला चर्चेला वाट मोकळी करून दिली आहे. कारण न्यायालयाने निर्णयच तसा दिला आहे.जमीन अधिग्रहणाचा वाढीव मोबदला न दिल्या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने तोंडगाव धुमका टोल नाका जप्त करण्याचा आदेश दिला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी सात जुलै रोजी सत्तेच्या वॉरंट वर स्वाक्षरी केले. शेतकऱ्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी टोल नाक्यावर जप्तीची कारवाई करण्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असल्याची माहिती पीडित शेतकऱ्यांचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट उदय देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. टोलनाका जप्तीचा राज्यातील पहिलाच निर्णय असल्याचा दावाही त्यांनी केलाय शेतकऱ्याला देय असलेली नुकसान भरपाई वसूल करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यावर जप्तीची कारवाई करण्याचा हा आदेश विदर्भासह राज्यातील पहिलाच असल्याचा दावा एडवोकेट उदय देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केलाय.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात तसेच न्यायच्या प्रतिक्षेत असलेल्या अनेकांच्या अशा पल्लवित झाल्या आहेत.
