Marathi Maharashtra News
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
No Result
View All Result
Marathi Maharashtra News
No Result
View All Result

पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

Marathi Maharashtra News by Marathi Maharashtra News
23 April 2026
in Breaking News
0
पूर्णवादी नागरी सहकारी बँकेकडून भ्रष्टाचार झाल्याची कबुली 

बीड : जालना मर्चंट बँकेच्या व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीनुसार वेअर हाऊस मालक रायचंद कुरंगळ यांच्यासह तीन जणांना जालना स्थानिक गुन्हे शाळेच्या पोलीसांनी अटक केली आहे. जालना मर्चंट बँकेत ५४ कोटींचे कर्ज शेतीमालाच्या पावत्यांच्या आधारवर दिले गेले आहे, पंचमुखी वेअरहाऊसच्या पावत्यांवर १७७ जणांना ५४ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आहे होते मात्र पंचमुखी वेअरहाऊस मध्ये शेतीमाल अस्तित्वात नसल्याचे निदर्शनास आणि मग कारवाई झाली.

ताशीच परिस्थिती ही बीडच्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेची आहे. पूर्वदीने ३१ जणांना १० कोटी कर्क दिले आहे आणि पूर्णवादी बँकेच्या जालना शाखेने सुद्धा याच पंचमुखी वेअरहाऊसच्या पावत्यांच्या आधारावर कर्ज दिले आहे.

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

या प्रकरणी मराठी महाराष्ट्र डिजिटल मिडिया मीडियाने सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० कोटी कर्ज पूर्णवादी बँकेने दिलेले असल्याचे वृत्त दि. १२ एप्रिल रोजी प्रसारित केले होते आणि पुराव्यानिशी पुन्हा एकदा पूर्णवादीच्या ठेवीदारांच्या आणि नागरिकांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

मराठी महाराष्ट्र न्यूज च्या बातमीनंतर पूर्णवादीच्या संचालक मंडळात गोधळ उडाला आणि त्यांनी थेट जालना गाठून काय घडलं? हा भ्रष्टाचार कोण कोणाला माहिती आहे? काय काय घडलं आहे हे पाहिले आणि शांत बसले आठवडा उलटून गेला मात्र काहीही कारवाई झाली नाही आज पुन्हा मराठी महाराष्ट्र न्यूज च्या धक्कादायक बातमीने पूर्णवादी पूर्ण हादरली आणि त्यांनी एक कबुली जाहीर आवाहन माध्यमांना दिले ते पुढील प्रमाणे आहे.

पूर्णवादी बँकेचे सर्व सभासद, ग्राहक, हितचिंतक यांना नम्र आवाहन

पूर्णवादी बँकेच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून ३१/०३/२०२६ अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू. ९६१ कोटी व कर्जे रू. ५६९ कोटी असा एकूण व्यवसाय रू.१५३० कोटी आहे. तसेच गुंतवणूक रू.४३९ कोटी व बँकेचा नेट एनपीए केवळ ०.६२ % आहे. तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळातील सदस्य हे बीड शहरातील नामांकित व सर्व परिचित आहेत त्यामुळे मिडीया मध्ये आमच्या जालना शाखे संदर्भात येत असलेल्या बातम्यामुळे गोंधळून न जाता बँकेवर विश्वास ठेवावा व आपणास या संदर्भात काही अडचणी असल्यास बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, बँकेचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर, तसेच बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सी.ए. एस. पी. लड्डा तसेच संचालक मंडळातील सर्व संचालक, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांचेशी संपर्क साधावा असे नम्र आवाहन करण्यात येते. 

आमच्या जालना शाखेमध्ये पंचमुखी वेअरहाऊसच्या मालाच्या पावती तारण कर्जात पंचमुखी वेअरहाऊसचा प्रोप्रायटर रायचंद सखाराम कुरंगळ व या कर्जप्रकारातील कर्जदार यांनी संगनमत करून या सर्वांनी मिळून बँकेची दिशाभूल केली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. २१/०४/ २०२६ रोजी या सर्वांच्या विरोधात पोलिस स्टेशन, जालना येथे गुन्हे दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

आज अखेर या कर्जप्रकारात ३२ पैकी ९ कर्जखाती बेबाक झाली आहेत व २३ खात्यावर एकूण कर्ज येणेबाकी रू. ८ कोटी १३ लाख इतकी आहे व काही कर्जात वसुली चालू आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय हा रू. १५३० कोटीचा असल्याने या कर्जांची बँकेस तोशीस लागणार नाही अशी आमची खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून बँकेच्या विरोधात प्रसारित होणा-या बातम्यामुळे विचलित न होता बँकेवर विश्वास ठेवावा. बँकेचे सर्व सभासद , ग्राहकांचे बँकेबरोबर असलेले आर्थिक संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

 

वारील प्रमाणे पूर्णवादी बँकेच्या वतीने ठेवीदारांना आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनात पहिला मुद्दा त्यांनी असा सांगितला की पूर्णवादी बँकेची व्यावसायिक आर्थिक स्थिती काय आहे हे सांगितले त्याचबरोबर संचालक मंडळ हे बीड मधील आणि नामांकित आहेत असे सांगितले म्हणून मीडियावर लक्ष देऊ नका असे सांगितले मात्र ज्ञानराधा आणि सुरेश कुठे हे सुद्धा नामांकित होते आणि ते बीडमधीलच आहेत ज्ञानराजाची आणि सुरेश कुटेंची आज काय स्थिती आहे हे संपूर्ण राज्याला माहीत आहे.

 

आवाहनात दुसरा मुद्दा त्यांनी मांडला आहे की आमच्या जालना शाखेमध्ये पंचमुखी वेअरहाऊसच्या मालाच्या पावती तारण कर्जात पंचमुखी वेअरहाऊसचा प्रोप्रायटर रायचंद सखाराम कुरंगळ व या कर्जप्रकारातील कर्जदार यांनी संगनमत करून या सर्वांनी मिळून बँकेची दिशाभूल केली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. २१/०४/ २०२६ रोजी या सर्वांच्या विरोधात पोलिस स्टेशन, जालना येथे गुन्हे दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल केली आहे. पूर्णवादी एकीकडे वेअर हाऊस मालक रायचंद कुरांगळ आणि कर्ज प्रकरणातील कर्जदार यांनी मिळून बँकेची दिशाभूल केली आहे आहे म्हटले मात्र काल दि.२० एप्रिल रोजी मराठी महाराष्ट्र न्यूज चे संपादक संग्राम धन्वे यांनी पूर्णवादीच्या मुख्य शाखेत जाऊन विचारणा केली की ज्याप्रमाणे जालना मर्चंट बँकेच्या व्यवस्थापकाने तक्रार दिली तशी तक्रार तुम्ही का दिली नाही त्यावर उत्तर देत तिथे असलेले महेश पारगावकर (जनरल मॅनेजर पूर्णवादी बँक) यांनी सांगितले की एकही कर्जदार बोगस नाही आम्ही पूर्णपणे पारदर्शक कर्ज दिलेले आहे व ते रिकव्हर सुद्धा फार चांगल्या पद्धतीने होत आहेत असे पारगावकर म्हणाले मग पूर्णवादी बँकेने आज दि.२१ एप्रिल २०२६ रोजी त्याच कर्ज प्रकरणातील लोकांवर कडक कारवाईची मागणी का केली आहे? याचा अर्थ कर्जप्रक्रियेत भ्रष्टाचार झाला आहे मात्र पूर्णवादी बँक ठेवीदारांची तसेच नागरिकांची दिशाभूल करत आहे.

 

तिसरा मुद्दा पमूर्णवादी बँकेडून आवाहनात असे म्हटले आहे की आज अखेर या कर्जप्रकारात ३२ पैकी ९ कर्जखाती बेबाक झाली आहेत व २३ खात्यावर एकूण कर्ज येणेबाकी रू. ८ कोटी १३ लाख इतकी आहे व काही कर्जात वसुली चालू आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय हा रू. १५३० कोटीचा असल्याने या कर्जांची बँकेस तोशीस लागणार नाही अशी आमची खात्री आहे.

तर आता बँकेच्या म्हणण्याप्रमाणे इतका पारदर्शक कर्ज व्यवहार आहे तर आज २१ रोजी त्या कर्जदाराच्या विरोधात पोलिसात तक्रार का दाखल केली? चौथा मुद्दा असा मांडला की बँकेचा एकूण व्यवसाय हा १५३० कोटींचा आहे त्यामुळे अशा ८ कोटींच्या कर्जाचा बँकेला काही त्रास होणार नाही. याचा अर्थ असा आहे की दिलेले कर्ज बुडीत आहे ते बोगस आहे, ते मिळणार नाही आणि नाही मिळाले तरी बँकेचे काही नुकसान होणार नाही बँक खूप मोठी आहे म्हणजेच भ्रष्टाचार झाला आहे, पूर्णवादी बँकेने भ्रष्टाचार झाल्याचे कबुल केले आहे असाच अर्थ पूर्णवादी बँकेने केलेल्या आवाहनातून दिसून येत आहे, त्यामुळे ठेवीदारांनी आता जागरूक गरजेचे आहे.

Tags: purnavdi bank beedपूर्णवादी नागरी सहकारी बँक म. बीडपूर्णवादी बँके घोटाळाबीडबीड बँक बातमी
Previous Post

मनोज जरांगेच्या हत्येच्या कटाचे आरोप असलेल्या अमोल खुनेचे धक्कादायक खुलासे

Next Post

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

Next Post
शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

शिवसेना महिला विभाग प्रमुखांसाठी व पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

मोठी बातमी : पुण्यात महिलेवर घरात घुसून दोन महाराजांनी केला अत्याचार;पोलीसात गुन्हा दाखल 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Breaking News
  • अहमदनगर
  • आरोग्य व शिक्षण
  • ई पपेर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • ताज्या बातम्या
  • देश-विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • पुणे
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुख्य शहरे
  • मुंबई
  • राजकीय
  • शेत-शिवार
  • संपादकीय
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134

No Result
View All Result
  • Breaking News
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश-विदेश
  • आरोग्य व शिक्षण
  • शेत-शिवार
  • क्राईम
  • धार्मिक
  • मनोरंजन
  • मुख्य शहरे
    • बीड
    • संपादकीय
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अहमदनगर
    • नाशिक
    • सातारा
    • जालना
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली

© 2023 Marathi Maharashtra News - Premium WordPress news & magazine theme by Softisky | 9764331134