बीड : ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत वै.भगवान बाबा यांनी सन 1951 पासून भगवान गड येथे सुरू केलेला पारंपारिक दसरा मेळावा.बाबानी सुरू केलेल्या दसरा मेळाव्याची परंपरा त्यांच्या नंतर वै.भिमसिंह महाराज यांनी चालू ठेवली.
लोकनेते स्व.गोपीनाथ रावजी मुंडे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहून संपूर्ण बहुजन समाजाला दिशा देण्याचे कार्य करत असत हाच त्यांचा वारसा पुढे चालवत दसऱ्याची परंपरा लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांनी भगवान बाबा यांचे जन्मगाव सावरगाव घाट ता.पाटोदा येथे सुरू केली आहे. भगवान बाबा यांच्या संदेशा नुसार समाज शिकला पाहिजे,समाजाची प्रगती झाली पाहिजे,अनिष्ट रूढी,प्रथा,परंपरा खंडित झाल्या पाहिजेत हेच खरे दसरा साजरा करण्याचे प्रतिक होय.त्याच नुसार पंकजाताई ह्या माध्यमातून बाबांचा संदेश सर्व समाजा पर्यंत पोहचविण्याचे काम करत आहेत.आपला दसरा मेळावा म्हणजे भक्ती आणि शक्ति चा संगम आहे.
या मेळाव्याला महाराष्ट्रातून तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक भगवान बाबा,स्व.मुंडे साहेब यांचे आशिर्वाद घेण्यासाठी तसेच लोकनेत्या पंकजाताई यांचे विचार ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतात.या मेळाव्यास शेतकऱ्यापासून ते उद्योगपती पर्यंत,ऊसतोडणी कामगारापसून ते कारखानदारापर्यंत,राजकीय नेते मंडळी,वारकरी संप्रदाय,अधिकारी,विद्यार्थी,महीला, आबालवृद्ध,सर्व स्तरातील लोक आपल्या पदाचा बडेजाव पणा बाजूला ठेऊन भगवान बाबा यांचे भक्त म्हणून सामील होतात.
या मेळाव्यास लोक स्वखर्चाने,निस्वार्थी भावनेने एकत्र येतात हेच या दसरा मेळाव्याचे वैशिष्ट्य होय. पंकजाताई यांनी म्हटल्या प्रमाणे एक दशक विश्वासाचे,एक दशक परंपरेचे,एक दशक प्रचंड गर्दीचे,एक दशक त्याच गर्दीच्या सीमोल्लंघनाचे,त्यामुळे सर्वांनी शनिवार दिनांक 12. ऑक्टोबर रोजी लाखोच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस ॲड.सर्जेराव तात्या तांदळे यांनी केले आहे.
लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा संपन्न झाल्यानंतर त्याठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या,खाद्य पदार्थ खाऊन टाकलेले पेपर चे तुकडे, कॅरीबॅग,झालेला कचरा हा सर्वांनी थांबून संपूर्ण परिसर स्वच्छ करावा तसेच स्वच्छता अभियान राबवावे असे आवाहन कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांना ॲड.तांदळे यांनी केले आहे.