बीड : डॉक्टर योगेश शिरसागर आणि सारिका शिरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज अजित पवार गटामध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्याशिवाय हा प्रवेश होणार आहे. मागील दोन दिवसापूर्वी जयदत्त क्षीरसागर यांनी आपला या प्रवेशाशी काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज पुन्हा एकदा नव्याने त्यांनी भूमिका मांडली आहे जयदत्त क्षीरसागर म्हणाले की आज जो प्रवेश होतो आहे त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही व जे काही माझे फोटो वापरतील, त्या जाहिराती ईतर बातम्या बद्दल कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये मी जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही असं जयदत्त क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्ट करून म्हटलं
जयदत्त क्षीरसागर यांनी पोस्ट
आज मुंबई येथे होत असलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाशी माझा कसलाही संबंध नाही, सर्वांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कुठलाही राजकीय निर्णय घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका मी कालच जाहीर केली आहे, तरीही माझ्या फोटोचा वापर करून कार्यकर्त्यांची व जनतेची दिशाभूल व संभ्रम निर्माण करणाऱ्या चुकीच्या जाहिराती व बातम्यांवर कृपया विश्वास ठेवू नये.
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर.