बीड : तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे तालुक्यातील धावज्याचीवाडी येथील गुंडीराम भोसले नामक व्यक्तीने आपल्या स्वतःच्या बायकोचा खून केला आहे. नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास मंगल भोसले या शेतामधील जनावरांच्या गोठ्यामध्ये काम करण्यास गेले असता मंगल भोसले यांचे पती गुंडी राम भोसले याने खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करत मंगल भोसले यांचा खून केला.
यामध्ये खळबळजनक प्रकार म्हणजे पत्नीचा खून केल्यानंतर गुंडीराम भोसले हे नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाले आणि हत्येची कबुली दिली.
सकाळी नेकनूर पोलीस ठाण्यात दैनंदिन कामे सुरू होती. पोलीस कर्मचारी काही स्थानिकांच्या तक्रारी ऐकत होते. तेवढ्यात गुंडीराम भोसले पोलीस ठाण्यात आला. समोर बसलेल्या अधिकाऱ्याने काय काम आहे असे विचारल्यानंतर गुंडीराम भोसले यांनी साहेब मी माझ्या बायकोला मारून आलोय, मला अटक करा असे चेहऱ्यावर शांत भाव ठेवून त्यांनी सांगितले.
यानंतर पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. गुंडीराम भोसले वय – ५० असे आरोपीचे नाव आहे गुंडराम भोसले यांनी ठाण्यात येण्याचा अगोदर पत्नी मंगल भोसले यांचा शेतातील गोठ्यात डोक्यात खोऱ्याचा दांड्याचा वार करून. मंगल भोसले या अंगणवाडी शिक्षिका होत्या. मंगल भोसले यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, नेकनूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास हजारे, पोलिस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार आणि नेकनूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरुवात केली. मृतदेह शविच्छेदनासाठी स्त्री रुग्णालय नेकनूर या ठिकाणी नेण्यात आला आहे.