बीड : स्थानिक गुन्हे शाखा या विभागाला पोलिस दलात मोठे महत्त्व आहे. ही शाखा मुख्य गुन्हेगारी, चौकशी आणि अत्यंत संवेदनशील गुन्हेगारीचा शोध घेत असते, शिवाय कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीच्या शोधांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचा ( LCB ) कर्मचारी तत्पर असतो.
पोलिस खात्यात आणि पत्रकारांची नेहमी चर्चा असते की स्थानिक गुन्हे शाखेचा (LCB) प्रमुख होण्यासाठी लॉबिंग चालते मग या विभागाचा प्रमुख होण्यासाठी का बरं सर्वजण इच्छुक असतात? नेमकं काय विशेष असते या विभागात? असा प्रश्न मला नेहमी पडायचा आता त्या प्रश्नाचे उत्तर मला मिळायला सुरुवात झाली आहे.
असो तो त्यांचा खासगी विषय आहे मूळ विषयाकडे येतो काल मी एक बातमी केली ती स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईची की कारवाई झाली मात्र अधिकृत प्रेसनोट काढून ती कारवाई कशी केली हे सांगितले नाही.
एवढेच नाही तर कारवाईत सावळा गोंधळ आहे का? असा सवाल मी उपस्थित केला होता.
मात्र त्या कारवाईत खरंच सावळा गोंधळ आहे हे स्पष्ट आहे कारण काल रात्री चक्क ११:४७ वा. प्रेसनोट काढली बरं काढली काढली ती ही चुकीची माहिती देणारी काढली, यावरून हे सिद्ध होते की कारवाईत आणि कामकाजात सावळा गोंधळ आहेच.
त्यात खरी माहिती अशी आहे की कारवाई बीड तालुक्यात झाली आहे कारवाईत ८ दुचाकी गाड्या होत्या त्यातील चारच दाखवल्या बाकी चार सोडून देण्यात आल्या ताब्यात घेतलेल्या चार दुचाकी गाड्या कोणाकडे होत्या ते लोकं सोडून देण्यात आले ते का सोडले? याचं उत्तर कारवाई करणारे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखाने दिले पाहिजे.
दुचाकी गाड्या चोरणारा पकडला मात्र वापरणारे सोडून का दिले? असेच सोडून दिले त्यांच्यावर कारवाई का नाही? मग त्या वापरणाऱ्या लोकांकडून काही देवाणघेवाण झाली आहे का? हे ( LCB ) ने सांगावं. विशेषतः चोरीच्या ८ गाड्या पकडल्या त्यातील चार गाड्या चोरीच्या असतांना का सोडून दिल्या? त्या अशाच सोडून दिल्या आहेत की काही देवाणघेवाण झाली? याचंही उत्तर (LCB) ने द्यावं.
मग याचसाठी (LCB) चा प्रमुख व्हायचे असते का? तिथे मलिदा खायला मिळतो म्हणून लॉबिंग चालतं का? गुन्हेगार वाढतात आणि गुन्हेगारी याचमुळे फोफावली आहे का? गुन्हेगार याचमुळे पोलिसांना घाबरत नाहीत का? असे एक ना अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
पोलिस अधीक्षक साहेब पोलिस खात्यात मत्वाचा विभाग मानल्या जाणाऱ्या विभागात ताळमेळ लागणार नाही आशा कारवाया केल्या जात असतील आणि सेटलमेंट करून आरोपी सोडून दिले जात असतील तर हे गंभीर आहे. गुन्हेगारी फोफावण्याला हेच लोकं जबाबदार आहेत असं का वाटू नये? यांची कानउघाडणी करणं गरजेचं आहे अन्यथा गुन्हेगार गजबजलेल्या शहरात दिवसा लूटमार करतील आणि लोकं पोलिसांवर विश्वास ठेवणार नाहीत.
दरम्यान त्या ८ गाड्या कोणत्या? त्या कुठल्या? कोण वावरते? कशाकाय सोडून दिल्या? यासंदर्भात सविस्तर माहिती देणारी बातमी लवकरच प्रसिध्द करतो आहे.