बीड : नगरपरिषद रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रमुखाची धाकधुक वाढली आहे. अध्यक्ष पदासाठी उमेदवारांची प्रचंड मागणी आहे मात्र पदाला शोभेल असा, जनतेच्या मनात असेल असा, लोकप्रिय चेहरा असणे महत्वाचे आहे. बीड नगर परिषद निवडणूक लागली आणि पुन्हा राजकारण दोन्ही क्षीरसागरांच्या अवती-भोवती फिरू लागले आहे
सगळी सूत्र तिथून हलू लागली आहेत. मागील तीन दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण सुरू आहे त्यांतून ऐक सक्षम उमेदवार निवडावा लागणार आहे.
आ. संदीप क्षीरसागर यांचा उमेदवार ठरला नसला तरी जनतेच्या मनातील सर्व जाती धर्माच्या समूहात निर्विवादपणे मिळूनमिसळून राहणारा चेहरा हा विष्णू वाघमारे यांचा आहे आणि त्याच्या पत्नी स्मिता वाघमारे या सक्षम चेहरा आहेत हे बीडच्या मतदारांनी अगोदरच ठरवून घेतले आहे त्यामुळे विष्णू वाघमारे यांना प्रचार करण्याची गरज भासणार नाही अशी परिस्थिती सध्या आहे.
विष्णू वाघमारे यांना तीस वर्षाचा तगडा अनुभव
आपल्या प्रभागातून सहा वेळा निर्विवादपणे सर्व जातीसमूहाच्या प्रभागातून सतत निवडून जाणारा चेहरा हा संपूर्ण बीड शहरात ख्यातनाम आहे. गेली तीस वर्षे नगर परिषद प्रशासनात कामकाजात सक्रिय राहणारा नगरसेवक म्हणून विष्णू वाघमारे यांची ओळख आहे. प्रभागातील एकही मतदाराची त्यांच्या विरुद्ध कधीच तक्रारा केलेली नाही. प्रामुख्याने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले आज त्याच कामाची पावती म्हणजे लोक त्यांना डोक्यावर घेत आहेत, कारण विष्णू वाघमारे कामाचा माणूस आहे तो फक्त नगरसेवक म्हणून नाही तर नगराध्यक्ष म्हणून पदावर असला पाहिजे त्याशिवाय बीड शहराचा विकास होणार नाही.
आ. संदीप क्षीरसागर यांचे पारडे वाघमारे यांच्यामुळेच जड
आ. संदीप क्षीरसागर यांनच्याकडे वाघाने आहेत म्हणून त्यांचे पारडे जड आहे असे आज बोलले जात आणि ईतर दुसरा उमेदवार असेल तर संदीप क्षीरसागर सत्ता स्थापन करू शकणार माहित असे चित्र शहरात आहे. कारण अनुसूचित जाती समूहाचा एकमेव चेहरा विष्णू वाघमारे याच्या पत्नी स्मिता वाघमारे आहेत. विष्णू वाघमारे गेल्या ३० वर्षापासून शहरात सक्रिय आहेत, शहरातील व्यापारी, नोकरदार, सुशिक्षित, आणि विविध जातीधर्माच्या प्रभागातून सतत निवडून येणारा चेहरा आहेत. म्हणून संदीप क्षीरसागर यांना हा उमेदवार प्रभावी असेल वाघमारे डावलून पैसे खर्च करणारा किंवा तात्पुरते समीकरण जुळवून मीच कसा निवडून येतोय हे दाखवणारा उमेदवार संदीप क्षीरसागर देणार असतील तर नगर परिषदेवर पाणी सोडावे लागणार आहे.
स्मिता वाघमारे उमेदवार असतील तरच संदीप क्षीरसागर यांच्यासोबत राहू
डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा माणूस उमेदवर पाहिजे, त्यांना अभिप्रेत असलेला समाज घडवण्याची ताकत असणारा उमेदवार पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलीत समाजाची उन्नती करण्यासाठी ही संधी समाजाला उपलब्ध करून दिली आहे, मागच्या दारातून घुसखोरी करून समाजाचे पांडघुरू घालून, माझ्याकडे प्रमाणपत्र आहे मग मी अनुसूचित जाती समूहातून निवडणूक लढवणार अशा लोकांना समाज स्वीकारणारा नाही. जात बाजूला राहूद्या मात्र माणूस म्हणून तुम्ही एखाद्या दलीत समाजाच्या व्यक्तीला का स्वीकारत नाहीत? आरक्षण अनुसूचित जातीसाठी जाहीर झाले की पर्याय शोधले जातात, मात्र ज्याचे आयुष्य समाजहितासाठी खर्च झाले त्याला न्याय का नाही? आणि म्हणून बहुजन समज बहुजनांचा विचार आणि विकास करणारा चेहरा म्हणून विष्णू वाघमारे यांच्या पत्नी स्मिता वाघमारे यांना उमेदवारी मिळाली तर संदीप क्षीरसागर यांच्या सोबत जाऊ अन्यथा आम्ही वेगळा पर्याय निवडू अशा भूमिकेत इथला बहुजन समाज आहे.

















