बीड : पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगड आणि शिरूर कासार तालुक्यातील नारायणगडावर आज (दि.१२) दसरा मेळाव्यानिमित्त जाणाऱ्या १० हजार भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश क्षीरसागर, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, समर्थकांच्या पुढाकारातून हे नियोजन करण्यात आले. बीड शहरानजिक असलेल्या नवगण शिक्षण संस्था संचलित सैनिकी विद्यालयासमोरील मुख्य रोडलगत भाविकांसाठी स्टॉल उभारून आज दिवसभर अल्पोपहार, पाण्याची उत्तम सोय केली जाणार आहे. या मार्गावरून भगवान भक्तीगड, नारायणगडावर जाणाऱ्या भाविकांनी अल्पोपहाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.योगेश, डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी केले आहे.