बीड : शहरात कर्रर्रकश आवाज करून सामान्य नागरिकांना त्रस्त करणाऱ्या बुलेट राज्यांची मस्ती बीड पोलिसांनी उतरवली आहे. आज रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस दलाने बीड शहरांमध्ये जोरजोराने सायलेन्सर चा आवाज करणारे बुलेट चालकावर कारवाई करून ४० बुलेट चे सायलेन्सर काढून घेतले आहे, आणि ते जप्त सुद्धा करण्यात आले आहेत.
जोपर्यंत बुलेटला कर्रर्रर्रकश आवाज करणारे बुलेटवाले आहेत तोपर्यंत ही कारवाई अशाच प्रकारे पुढेही चालू राहील असा ईशारा बीड पोलिसांनी दिला आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सानप आणि अंमलदार शेख उस्मान नितीन शिंदे, संतोष हंगे, दत्ता उबाळे, ज्ञानेश्वर जाधव, नारायण वाघमारे, शिवदास घोलप, आणि महारुद्र डोईफोडे यांनी केली आहे.
दरम्यान बीड वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे हुल्लडबाज बुलेट चालकांचे धाबे दणाणले आहेत.
खरंतर दुसरी महत्वाचे म्हणजे बीड शहरात अनधिकृत सायरन लावून फिरणाऱ्या दुचाकी, आणि चार चाकी गाड्या असंख्य आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बीड शहरात अल्पवयीन शाळकरी मुले ज्यांना वाहतुकीचे कसलेही नियम माहीत नाहीत ते बेकायदेशीर दुचाकी वाहने चालवत आहेत. त्यांच्या सुद्धा शहरांतील सुरळीत वाहतुकीला फार अडथळा असून अपघातांचे प्रमाण वाढले तर वादविवाद सुद्धा याकरणाने होत आहेत. आशा बेशिस्त लोकांवर सुद्धा कारवाई होणे गरजेचं आहे, जे शाळकरी मुले अल्पवयीन आहेत त्यांच्या बालकांवर नियमानुसार कारवाई कारण गरजेचं आहे.