बीड : दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत बीड शहरामध्ये असणाऱ्या आदित्य कृषी महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या कृषी कन्यांनीनी आहेर वडगांव ता. जि.बीड येथे पशु लसीकरण मोहीम दिनांक २०२३ ऑगस्ट २०२३ रोजी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी उद्योग संलग्न उपक्रम या अंतर्गत राबविण्यात आला.
तसेच जनावरांना पावसाळ्यात होणारी आजार व घ्यावयाची काळजी गोठ्यातील स्वच्छता खेळती हवा स्वच्छ पाण्याचे व्यवस्थापन लसीकरणाचे महत्त्व अस्वच्छतेमुळे उद्भवणारे रोग व होणारे दुष्परिणाम याबाबतची माहिती शेतकऱ्यांना पटवून दिली.
पावसाळा हा ऋतू शेती व पशुपालन व्यवसायाकरिता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे पावसामध्ये पशूंची शास्त्रयुक्त संगोपन करणे गरजेचे असते संतुलित आहार पुरवणे प्रतिकूल वातावरणात आवश्यक निवारा न दिल्यास तसेच किटकापासून संरक्षण न केल्यास जनावर विविध संसर्गजन्य आजारांना बळी पडू शकतात असे याप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदितीजी सारडा मॅडम आणि आदित्य कृषी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे, श्याम भुतडा आणि पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग विषय तज्ञ डॉ. धनंजय सातपुते, कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे, कार्यक्रम अधिकारी युवराज धवणे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आणि यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी विद्यर्थिनीं कृषिकन्यां कु. प्रिती कानवडे, वैष्णवी मुळे, साक्षी डाखोरे, निकीता भोसले, कोमल लोखंडे, गौरी मोटे, मेघा देवढे, मृणाली चौधरी. पशुवैद्यकीय डॉ.जाधव यांच्या मदतीने करण्यात आले जनावरांना लंपी आणि खुरकूत रोगासाठी लसीकरण यशस्वीरित्या देण्यात आली.या समवेत गावातील प्रगतशील शेतकरी शिवाजी रोहिटे, रघुनाथ रोहिटे, अशोक काटे, रामहरी रोहिटे, विष्णु रोहिटे, बप्पासाहेब दावरे , संदिप काटे, सुदामा रोहिटे समवेत गावातील ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला .