बीड : जागतिक स्तरावर रोटरी क्लबने समाजसेवेचा वसा उचललेला आहे. समजहितासाठी रोटरी क्लब गेल्या अनेक वर्षांपासून विविध उपक्रम राबवणारी एक सामाजिक संघटना बनली आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करण्यासाठी आणि आपल्या वर्तुळाच्या बाहेर मैत्रीचे संबंध वाढावेत या उद्देशाने प्रत्येक जिल्ह्यात रोटरीचे मोठे आणि व्यापक संघटन तयार झालेले आहे. अगदी याप्रमाणेच बीड शहरात देखील रोटरी क्लब ऑफ बीड सिटी ही संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.
दि.८ जुलै रोजी सायंकाळी बीड शहरातील हॉटेल नीलकमल येथे रोटरी क्लब ऑफ बीड सिटीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या अध्यक्षपदी ट्विनकलिंग स्टार स्कूलचे संस्थाचालक तथा सुप्रसिद्ध उद्योजक गणेश मैड यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर सचिवपदी ईश्वर मुथा यांची नियुक्ती झाली. याबरोबरच विविध पदाधिकाऱ्यांची देखील विविध पदावर नियुक्ती करण्यात आली.
रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून प्रसिद्ध व्यख्याते, पत्रकार तथा समजसेवक डॉ धनंजय देशपांडे आणि रोटरीचे उपप्रांतपाल डॉ निशिकांत पाचेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड शहरातील चिमुकल्यांच्या डान्स ग्रुपने स्वागत नृत्य सदर करून कार्यक्रमात रंगत आणली.
स्वागतनृत्यानंतर मान्यवरांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली यानंतर मावळते अध्यक्ष दीपक करणावत यांनी गत वर्षातील कार्याचा आढावा सादर करून नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश मैड यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार सोपवला. गणेश मैड यांनी आपल्या भाषणात आगामी काळात रोटरी क्लब ऑफ बीड सिटी समजहितासाठी सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रातील अभिनव उपक्रमांची यशस्वी उभारणी करून आपले कार्य सिद्ध करेल अशी सर्व सदस्यांनी शाश्वनती दिली.
पदग्रहण सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मान्यवर डॉ धनंजय देशपांडे आणि रोटरीचे उपप्रांतपाल डॉ निशिकांत पचेगावकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश मैड आणि सचिव ईश्वर मुथा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याबरोबरच रोटरी क्लब ऑफ बीड सिटीमध्ये नव्याने समावेश झालेल्या अनेक सदस्यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ बीड सिटीच्या पदग्रहण सोहळ्यासाठी रोटरी सिटीच्या सर्वच सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले तर या सोहळ्यासाठी सदस्य आपल्या परिवारासमवेत मोठ्या संख्येने उपस्थित होते.