परळी : देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वात आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थान राज्यात अव्वल असेल, यामध्ये बीड जिल्ह्याचे सर्वाधिक योगदान राहावे, यासाठी आपण सर्वजण नियोजनबद्ध रित्या कार्य करत राहू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त आ. धनंजय मुंडे यांच्या जगमित्र संपर्क कार्यालयासमोरील प्रांगणात आ. धनंजय मुंडे यांच्या हस्ते सकाळी १०.१० मिनिटांनी राष्ट्रवादी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित मान्यवर व सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, यानिमित्ताने सर्व सहकाऱ्यांना व राष्ट्रवादी प्रेमींना शुभेच्छा देतो, तसेच आगामी काळात पक्ष संघटन वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा संकल्प व्यक्त करतो, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मणराव पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जयपाल लाहोटी, वैजनाथराव सोळंके, रवी मुळे, किशोर पारधे, दत्ता सावंत, सय्यद शिराज, गोविंद कराड, राजेंद्र सोनी, मजाज इनामदार, सौ अन्नपूर्णा जाधव, डॉ. विनोद जगतकर, विजय भोईटे, रमेश भोईटे, वैजनाथ बागवाले, वसंतराव राठोड, संजय आघाव, लाला खान पठाण, रणजित सोळंके, सुरेश नानवटे, अमित केंद्रे, बळीराम नागरगोजे, बालाजी गित्ते, पवन फुटके यांसह आदी उपस्थित होते.