बीड : नुकतीच झालेली बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अतिशय रंगतदार झाली, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, शिवसेना, उध्दव ठाकरे गट, शिवसंग्राम, शेतकरी संघर्ष समिती यासर्वानी एकत्र येऊन ही निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापतींची निवड कधी होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.
दरम्यान ती सभापती-उपसभापती निवडण्याची तारिक निश्चित झाली असून येत्या १२ मे रोजी सभापती उपसभापती निवडले जाणार आहेत.
उपनिबंधक सहकारी संस्था बीड च्या वतीने जि. के.परदेशी यांची नियुक्ती करण्यात अली असून बाजार समितीच्या नोंदणीकृत उपविधितील तरतुदीनुसार सन २०२३ ते २०२८ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सभापती-उपसभापती यांची निवड ते करणार आहेत त्याअनुषंगाने शुक्रवार दि.१२ मे रोजी दुपारी ११.०० वा सभा बोलावण्यात आले आहे.
दरम्यान बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कोण आणि उपसभापती कोण होणार याची उत्सुकता सर्वांना लागलेली आहे.