बीड : गेल्या दोन वर्षात बीडमध्ये ऐक ना अनेक प्रकरणं घडत आहेत ते प्रकरण राजकारण्यांच्या गुंडांकडून खून, लूटमार, अत्याचार अशा घटना केल्या जात आहेत त्यामुळं बीडचे नाव पूर्ण खराब झाले आहे. आज दि. ०७ रोजी पहाटेच्या सुमाराम ऐका व्यापाऱ्याने राजकीय व्यक्तीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. राम दिलीप फटाले वय ४३ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सदरील व्यक्तीने लक्ष्मण अश्रुबा जाधव आणि वर्षा लक्ष्मण जाधव या दोघांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
मयत राम फटाले याने लक्ष्मण जाधव यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते ते परत केले होते पैसे देताना चेक आणि बाँड लिहून दिले होते ते परत मागितले असता लक्ष्मण जाधव यांनी परत दिले नाहीत उलट वाढीव पैशाची मागणी केली. लक्ष्मण जाधव आणि त्याची पत्नी वर्षा जाधव या दोघं आपल्याला छळत असून जाचाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे असे राम फटाले यांनी त्यांच्या जवळ सापडलेल्या चिठ्ठीत म्हंटले आहे.
लक्ष्मण जाधव हा भारतीय जनता पक्षाच्या भटक्या विमुक्त आघाडीचा पदाधिकारी आहे, शिवाय पंकजा मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आणला जात आहे असे सांगितले जात आहे. दरम्यान याप्रकरणी मयत राम फटाले यांचे नातेवाईक पेटबीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी उशीरपर्यंत पोलिसात होते.

मयत राम फटाले यांनी सुसाईड नोटमध्ये काय म्हंटले आहे पहा.
प्रिय
सुजल व गौरी तु खूप मोठा हो तु आजी बाबा आई गौरी यांची तुला या पुढे सर्वची जबाबदारी देऊन मी या जगाचा निरोप घेत आहे
माझी गौरीची काळजी घे गौरीतु सुजल भया यी आजी बाबा आई काळजी घेतजा
सुजल गौनी माला माफ करा, मी तुमच्यासाठी कही करू शकलो नाही गौरी व सुजल आभ्यास करा खुप खुप मोठा व्हा तुमचा दळभद्र बाप.
प्रिय आई व पपा सुजल व गौरी रेणुका
मी चांगला मुलगा पती वडील होऊ शकत नाही तरी मला माफ करा रेणुका तुला माझी जागा घेऊन माझे आई वडि सुजल व गौरी यांची काळजी घ्यावी लागेल
शामभाऊ लखन माझे मुले व बायको आई वडील यांचा संभाळ करा व मला माफ करा
तुमचा सर्वचा राम
माझे वडिल यांच्या कडे माझी माती करण्यासाठी रुपये नाहीत माझी माती समाजतून वर्गनि करून करावी
झा दाहावा तेरावा, चौदावा करू नका कार कोणाला महिलेला बोलू नका वर्षश्रद करू नका ही माझी शेवटची इच्छा आहे असे त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहे.