बीड : जिल्हा शलचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सभागृहामध्ये लक्षवेधी केली आणि त्यानंतर कुठलाही विलंब न लावता संबंधित मंत्र्याकडून उत्तर आलं की आम्ही त्यांना निलंबित करत आहोत. अध्यक्षांनी सुद्धा ठासून विचारले की सस्पेंड करणार का? यावर उत्तर द्या त्यानंतर उत्तर देणाऱ्या मंत्र्यांनी त्यांना सस्पेंड करत आहोत अशा प्रकारचं उत्तर दिले.
नमिता मुंदडा यांनी ही लक्षवेधी मांडत असताना अशोक थोरात यांच्यावर जुना राजकीय राग काढल्यासारखी ही लक्षवेधी मांडली. नमिता मुंदडा यांना भ्रष्टाचार उघड करायचा होता? की अशोक थोरांचा सूट घ्यायचा होता? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
डॉ. अशोक थोरात यांना चौकशीमध्ये गाठायचं हे अगोदरच ठरलं होतं की काय? असा संशय येऊ लागला कारण अशोक थोरात यांच्यासोबत या प्रकरणांमध्ये १२ जणांची समावेश आहे. या प्रकरणांमध्ये १२ जण आहेत त्यापैकी एक निवृत्त झाले आहेत आणि तर एका अधिकाऱ्याचे निधन झाले आहे. उरले १० जण त्यापैकी फक्त अशोक थोरात यांनाच निलंबित करा अशा प्रकारची मागणी सभागृहामध्ये लावून धरण हा फक्त सुडाचा भाग आहे अशी चर्चा बीड जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे.
अशोक थोरात यांच्या समर्थक उद्या बीडमध्ये बीड करांच्या वतीने धरणे आंदोलन केले जाणार आहे, नमिता मुंदडा यांचा सकाळपासून बीड जिल्हाभरातून निषेध केला जात आहे. सामान्य नागरिक अशोक थोरात यांच्या मागे आहेत अशा प्रकारची सध्या जिल्ह्यात परिस्थिती आहे. नमिता मुंदडा यांना विधानसभेला अशोक थोरात यांनी सहकार्य केलं नसल्याचा राग मनात धरून नमिता मुंदडा यांनी ही लक्षवेधी केली आणि दहा जणांपैकी फक्त अशोक थोरात यांनाच निलंबित करा अशा प्रकारची मागणी केली त्यामुळे हा सगळा सुडाचा प्रकार आहे असं बोललं जात आहे.
चौकशीत समावेश असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी
१. डॉ. अशोक संपतराव थोरात
२. डॉ. सुर्यकांत रामचंद्र गिते
३. डॉ. सुर्यकांत अर्जुनराव साबळे
४. डॉ. सुखदेव सोमाजी राठोड
५.डॉ. बाबासाहेब ढाकणे
६. डॉ. महेशकुमार लक्ष्मणराव माने
७. डॉ. अशोक राधाकृष्ण हुबेकर
८. श्री. राजदिप कुलकर्णी
९. श्री. आदिनाथ विश्वनाथ मुंडे
१०. श्री. एजाज अली मीर शौकात अली
११. श्री.शेख मो. रियाजोद्यीन कमरोद्यीन
१२. श्री.तानाजी नागनाथ ठाकर