Editor by : sangram dhanve 9405359266
बीड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ अंतर्गत बीड शहरामध्ये असणाऱ्या आदित्य कृषि महाविद्यालय येथे शिक्षण घेत असलेल्या कृषि कन्यांनी आहेर वडगांव जि.बीड येथे शास्त्रीय पद्धतीने फळबाग लागवड केली.
दिनांक २६ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषि उद्योग संलग्न अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
आधुनिक शेतीमध्ये फळबाग लागवड करण्यामध्ये शेतकऱ्याचा कल वाढावा, आधुनिक शेतीतून शेतकरी प्रगतशील व्हावेत यासाठी विद्यार्थिनींनी आहेर वडगांव गावातील प्रगतशील शेतकरी रघुनाथ रोहिटे यांच्या शेतामध्ये एक एकर फळबाग लागवड करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. त्यामध्ये महत्वाची माहिती म्हणजे फळबाग लागवड करत असताना प्रामुख्याने उत्पादनाच्या दृष्टीने शास्त्रीय पद्धतीने लागवड केली पाहिजे, दोन झाडातील अंतर व्यवस्थित असेल तर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो, झाडांची कोंडी होत नाही व झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते, तसेच झाडातील अंतर हे प्रमाणात असेल तर झाडाची अंतर्गत मशागत करण्यासाठी सोपे जाते याशिवाय उत्पन्न देखील वाढते.
फळबागांची शेती केली तर फळ तोडणी ला येईपर्यंत त्यामध्ये आपण भाजीपाल्यासारखे आंतरपीक घेऊ शकतो त्यामुळे शेतकऱ्याना काही प्रमाणात आर्थिक पाठबळ मिळू शकते व अंतरपिकाच्या मिळकतीतून फळबाग लागवडीचा खर्चासाठी मदत सुद्धा होऊ शकते.
शास्त्रीय पद्धतीने फळबागेतील अंतर ठेवल्यास फळबागावर पडणारे रोग व कीटक यांचा प्रादुर्भाव होण्यापासून आपण रोखू शकतो शिवाय त्यात व्यवस्थापन योग्य पद्धतीने करू शकतो. तर अशाप्रकारे कृषिकन्यांनी शेतकऱ्यांना या उपक्रमाच्या माध्यमातून सटीक माहिती दिली येणाऱ्या काळात शेतकरी या माहितीच्या जोरावर नक्की यशस्वी होईल असे मतही यावेळी कृषी विद्यापीठाच्या विद्यर्थिनींनी वक्त केले आहे.
यावेळी प्रमुख उपस्थितीत डॉ.संदीप मोरे यांचे मार्गदर्शन,आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ.आदितीजी सारडा, आदित्य कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुकाराम तांबे, श्याम भुतडा कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप मोरे, कार्यक्रमाधिकारी युवराज धवणे व इतर प्राध्यापक व विषय तज्ञ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या होत्या कृषिकन्यां कु.प्रिती कानवडे, वैष्णवी मुळे,साक्षी डाखोरे, निकीता भोसले, कोमल लोखंडे,गौरी मोटे,मेघा देवढे,मृणाली चौधरी. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच सुशेन खरसडे, उपसरपंच अभिमान रांजवन ग्रामसेवक, दत्तात्रय लोमटे व ग्रामपंचायत सदस्य बाळु काटे या समवेत गावातील प्रगतशील शेतकरी शिवाजी रोहिटे, विष्णु रोहिटे, रघुनाथ रोहिटे, अशोक काटे, रामहरी रोहिटे, संदिप काटे, बप्पासाहेब दावरे, सुदामा रोहिटे, समवेत गावातील, ग्रामस्थांनी उत्तम, प्रतिसाद दिला व सर्व विद्यर्थिनींचे कौतुक केले.