परळी : प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन व ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली श्रावण महिन्याचा योग साधून प्रत्येक श्रावण सोमवारी पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भविकांसाठी वैद्यनाथ मंदिर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोफत प्रसाद (साबुदाणा खिचडी व राजगिरा लाडू) वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे सोमवार (दि. २१) रोजी सकाळी १० वा. ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन होणार असून, याप्रसंगी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांनी उपस्थित रहावे तसेच या मोफत प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नाथ प्रतिष्ठाणचे सचिव नितीन मामा कुलकर्णी यांनी केले आहे.
दरवर्षी नाथ प्रतिष्ठाण मार्फत श्रावण महिन्यात या प्रकारचे विशेष उपक्रम राबविले जातात. यावर्षी मोफत प्रसादासोबतच मंदिराची विविध फुलांनी खास सजावट करण्यात येत असून आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात येत आहे.