रायगड : जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी हे गाव दरडीखाली गेलं आणि राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे,रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळ गडाच्या पायथ्याशी डोंगराच्या कुशीत ५० ते ६० घरांची वाडी जी आजघडीला जमीनदोस्त झाली आहे.
२०१४ साली म्हणजेच ३० जुलै २०१४ साली डोंगरपायथ्याशी वसलेलं महाराष्ट्रातलं माळीण गाव पहाटे कोसळलेल्या दरडीखाली गडप झालं.
यात तब्बल १५१ जण मृत्युमुखी पडले होते, या गावाला पुन्हा उभं करण्यासाठी शासनपातळीवर जलदगतीनं हालचाली केल्या गेल्या आणि त्यातूनच ६७ नवीन घरं बांधण्यात आली.
२ एप्रिल २०१७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, त्यात जनावरांसाठी गोठा, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी, शाळा अशा प्रकारचं नवं रूप असलेलं माळीण गाव उभं राहिलं.
गाव उभा राहील खरं मात्र त्या गावातील १५१ जणांना आपला जीव गमवावा लागला हे विसरता येणार नाही.
आता हे आम्ही का सांगतोय तर माळीण गावची पुनरावृत्ती रायगड जिल्ह्यात घडली आहे, अक्खा गाव दरडीखाली गडप झालं आहे, इर्शाळवाडी अस त्या गावाच नाव आहे.
गेल्या चार दिवसांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे म्हणजेच बचावकार्य सुरू आहे, राज्यभरातून लोक तिथे मदतीसाठी पोहोचले आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन किलोमीटर पायी चालत घटनास्थळी पोहोचले, उध्दव ठाकरे आदित्य ठाकरे हे देखील त्याठिकाणी पोहोचले आणि काय मदत लागेल त्याबद्दल विचारपूस केली.
इर्शाळवाडी च्या दुर्घटनेत आतापर्यंत जवळजवळ २५ ते ३० जणांचा मृत्यू झाला असून ७० ते ८० जण दरडीखाली अडकल्याची माहिती आहे.
खरंतर दरडी कोसळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही नाही या आधी तळये, माळीण, विक्रोळी अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत ज्यामध्ये शेकडो लोक मृत्यू पावलेले आहेत.
इर्शाळवाडी चं सांगायचं झालं तर या गावाला जायला रस्ताच नाही, वाहने गावात जात नाहीत, पाऊलवाटा आहेत ज्यामार्गे जावं लागतं
आता या दरडी कोसळण्याच्या जबाबदार कोण आस विचारलं तर तुम्ही म्हणाल पाऊस, तर मुळीच नाही कारण देश स्वतंत्र होऊन तब्बल ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि इर्शाळवाडी सारखे शेकडो गावं महाराष्ट्रात आहेत जे अजूनही परतंत्र्यत आहेत,
शासनाच्या मूलभूत सुखसुविधा, योजना, शिक्षण, आरोग्य या गोष्टी तिथे माहीतच नाहीत एव्हढेच नाही तर या दरडी कोसळण्याला शासन जबाबदार आहे, राज्यकर्ते जबाबदार आहेत, कारण पावसाआधी ज्या गावांना धोका आहे त्यांना वेळीच सूचना दिल्या पाहिजे होत्या, त्या दिल्या गेल्या नसाव्यात, गावात विकासकामे नाहीत, वाहाने जाण्यासाठी रस्ता नसल्याने मदत वेळेवर पोहोचू शकली नाही परिणामी अनेक नागरिकांचा मृत्यू झाला.
पावसाळ्यापूर्वी नदीकाठच्या गावांना सांगूळलं जात सुरक्षित राहा, रायगड जिल्ह्यात सतत पाऊस असतांना कोणत्याही सूचना दिल्या नसाव्यात म्हणून लोक वाचले नाहीत असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही. त्यामुळे जेव्हा गरज होती तेव्हा नाही मात्र आता मयताच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली जात आहे. म्हणेज याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणता येईल.