बीड : ईवलेशे रोप लावियेेले व्दारी। त्याचा वेलू गेला गगनावरी॥ या संत ज्ञानेेश्वरांच्या अभंगाची प्रचिती यावी, असे यश कुटे ग्रुपने मिळवले आहे. देश आणि विदेशातील कोट्यावधी ग्राहकांच्या प्रचंड विश्वासाच्या बळावर उद्योग जगतात गगनभरारी घेत कुटे ग्रुपने साडेनऊ हजार कोटी रूपयांच्या टर्नवर्कचा टप्पा नुकताच ओलांडला. मार्च २०२४ पर्यंत १० हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याचे उदिष्ट कुटे ग्रुपने ठेवले आहे. हे सर्व केवळ ग्राहकांच्या विश्वासामुळे शक्य झाल्याची प्रतिक्रिया अर्चना सुरेश कुटे यांनी दिली.
एकेकाळी बीड जिल्हा म्हटले की, ऊसतोड मजूरांचा जिल्हा, मागास आणि दुष्काळी जिल्हा असे चित्र डोळ्यासमोर उभे रहायचे… मात्र याच मागास आणि ऊसतोड मजूरांच्या जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या सुरेश व अर्चना कुटे या दाम्पत्याने उद्योग जगतात ईवलेसे पाऊल ठेवले. कुटे दाम्पत्याच्या उद्योग जगतातील या सोनेरी पाऊलाने बीड जिल्ह्याला नवी ओळख प्राप्त करून दिली आहे… आज देशाच्या कोणत्याही कानाकोपर्यात बीड म्हटले की, कुटे ग्रुपवाल्यांचे बीड का? असे विचारले जाते. त्यास कारणही तसेच आहे. कुटे ग्रुपच्या ४९ हुन अधिक कंपन्या आहेत. भारतातील २६ राज्यांमध्ये कुटे ग्रुपचे उत्पादन पोचले आहे. गौरवाची बाब म्हणजे तिरूमलाचे खाद्य तेल व काही उत्पादनांना दुबई, शिंगापुर व ईतर अखाती देशात मोठी मागणी आहे. कुटे ग्रुपचे तिरूमला खाद्य तेल, तिरूमला गोल्ड, तिरूमला कोकनट ऑईल, तिरूमला पशूखाद्य याला देशभरात मोठी मागणी आहे. तसेच द् कुटे ग्रुप गुडमॉर्निंग डेरीचे दुध, दही, तुप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, दुध पावडर ही दुग्धजन्य पदार्थांचे ब्रँड बनले आहेत. तिरूमला आईल इंडस्ट्रीचा सर्वात मोठा प्रकल्प गंगापुर येथे आहे. हा प्रकल्प तब्बल १०० एकर क्षेत्रावर विस्तारलेला आहे. तसेच तिसगाव, फलटन, छत्रपती संभाजी नगर, बीड आणि नवी मुंबई, बानेर येथे मोठे प्रकल्प आहेत. त्याचप्रमाणे कुटे ग्रुपचे डीएनवाय सप्लाय चैन सोलूशन प्रा. लि., डीएनआर (DNR)अॅटो इंजिनिअरींग, ओएओ इंडीया (OAO) गेमिंग कंपनी हे उद्योग आहेत. छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई येथे भव्य असे कुटे ग्रुपचे कार्पोरेट ऑफिस आहेत. ग्राहकांचा विश्वास जिंकत कुटे ग्रुपने साडेनऊ हजार कोटी व्यवसायिक टप्पा ओलांडलाच आहे. आता मार्च २०२४ पर्यंत १० हजार कोटीचा टप्पा ओलांडण्याचा मानस आहे. लवकरच कुटे ग्रुपचा आयपीओ येणार असून गुंतवणुकदार याची अतुरतेने वाट पहात आहेत.
बीड सारख्या मागास भागातून उद्योग जगतात प्रवेश करूनही केवळ विश्वासाच्या बळावर कुटे ग्रुप देश- विदेशात जावून पोचला आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य शेतकरी, कामगार, वंचीत- उपेक्षीत घटकातील सुशिक्षीत मुला- मुलींना हक्काचा रोजगार देणारी इंडस्ट्री म्हणून कुटे ग्रुप पुढे आला आहे. कुटे ग्रुपच्या सर्व उद्योगातील कर्मचार्यांची संख्या दहा हजारापेक्षा अधिक आहे. यावरूनच कुटे ग्रुपच्या उद्योग जगतातील गगन भरारीची प्रचिती येते.
ग्राहकांचे शतश: आभार: अर्चना कुटे
कुटे ग्रुपच्या तिरूमला ऑइल व ईतर विविध कंपन्या आणि यातून उत्पादीत होणार्या वस्तू, खाद्यपदार्थ, हेअर ऑईल यावर देशभरातील कोट्यावधी ग्राहकांनी प्रचंड विश्वास दाखवला. कुटे ग्रुपने देखील ग्राहकांचा विश्वास कायम जपला. यामुळेच आज कुटे ग्रुपने साडे नऊ हजार कोटीच्या व्यवसायाचा टप्पा ओलांडला आहे. ग्राहकांच्या याच विश्वासाच्या बळावर कुटे गु्रप लवकरच दहा हजार कोटीचा टप्पाही ओलांडील, अशी प्रतिक्रिया कुटे ग्रुपच्या मॅनेजिंग डायरेक्टर अर्चना कुटे यांनी व्यक्त केली.
दातृत्वातही कुटे ग्रुप पुढे
ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर यशाचे शिखर गाठणार्या कुटे ग्रुपने सुरूवातीपासूनच सामाजिक दातृत्व जपले आहे. बीड शहरात एकाही नागरीकावर उपाशीपोटी झोपण्याची वेळ येऊ नये, यासाठी तिरूमला फाऊंडेशनच्या वतीने दररोज १०० हुन अधिक गरजूंना मोफत जेवन दिले जाते. कोरोणा महामारीच्या अतिशय कठीण काळात तर कुटे ग्रुप ‘जिथे कमी तिथे आम्ही’ म्हणत लोकांच्या पाठीशी उभा राहीला. हजारो कुटुंबांना अन्नधान्य, किराना साहित्य व जिवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. रस्त्यावर उभा राहून कोरोना योद्याची भूमिका बजावणारे पोलिस, डॉक्टर, विविध विभागाचे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांना लॉकडाऊनच्या काळात चहा, नाष्ट्याची व्यवस्था केली. जिल्हाभरातील वृध्दाश्रम, अनाथाश्रम ईतर सामाजिक प्रकल्पांना तर कुटे ग्रुपचा सतत मदतीचा हात असतो. विशेष म्हणजे क्रिडा स्पर्धा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कुटे ग्रुपचे योगदान असते.
तिरूमला खाद्य पदार्थ व हेअर ऑईलची नियोजित उत्पादने
येत्या काही दिवसात कुटे ग्रुपचे हेअर ऑईल व खाद्य पदार्थ उत्पादने येणार आहेत. यात हेअर ऑइलमध्ये अलमोंड ऑईल (बदाम तेल), अमला ऑईल (आवळा तेल), अॅलोवेरा ऑईल (कोरफड तेल), जास्मिन ऑईल,ओनियन एक्स्ट्रॅक्ट ऑईल (कांदा अर्क तेल), ब्राह्मी आमला ऑईल (ब्राह्मी आवळा तेल), ब्रिंघराज ऑईल (ब्रिंघराज तेल), गारलिक एनरीच (लसणाच्या गुणांनी समृद्ध), ऑलिव्ह एनरीच (ऑलिव्हच्या गुणांनी समृद्ध), अर्गण ऑईल (आर्गन तेल) तसेच नविन खाद्यपदार्था मध्ये तिरुमल्ला क्रीमी पीनट बटर, तिरुमल्ला कुरकुरीत पीनट बटर, तिरुमल्ला चॉकलेट पीनट बटर, तिरूमल्ला मध पीनट बटर, तिरुमल्ला स्मूथ पीनट बटर, तिरुमल्ला कच्चे शेंगदाणे, तिरुमल्ला रोस्टेड शेंगदाणा, तिरुमल्ला मसाला शेंगदाणा, तिरुमल्ला सोल्टी शेंगदाणे या नविन उत्पादनांचा समावेश आहे. ही उत्पादने लवकरच बाजारात येणार आहेत.