संतोष सपाटे | प्रतिनिधी
परळी : देशपातळीवरील कठिण समजल्या जाणाऱ्या जेईईत ( JEE ) मेन्स व जेईईत (JEE) ॲडव्हान्स अशा परीक्षेत घवघवीत यश मिळवले असून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ( Indian Institute of Technology ) चि.ॠषभ राजेंद्र लोढा याने प्रवेश मिळवला आहे ही परळीकारांसाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब असुन त्याचे या यशाबद्दल चि.ॠषभ राजेंद्र लोढा याचे राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आलं.
चि.ॠषभ राजेंद्र लोढा मेन्स व जेईईत ॲडव्हान्स या देशातील अतिशय कठीण अशा परीक्षेत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. त्याचा ( IIT ) इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, पालक डॉ.राजेंद्र लोढा हे उपस्थित होते.