मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या आमदार मनीषा कायंदे या सकाळपासून लॉटरीचेबल होत्या त्या आज संध्याकाळी शिंदे गटांमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे, आणि आता उद्धव ठाकरे गटाकडून त्यांची प्रवक्ते पदावरून हाकालपट्टी करण्यात आली आहे तशा प्रकारची नोटीस शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून आता जारी करण्यात आलेली आहे.
शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी मनीषा कायंदे यांनी शिवसेनेला सोडचिट्टी दिली आहे, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडचिट्टी दिली आहे आणि आता त्या आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत आणि पक्षविरोधी कारवायां केल्याचे सांगत मनीषा कायंदे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.