बीड : शासनाने घर खाली करण्याची नोटस पाठवली आणि एकाने विष प्राशन केले, बीड शहरातील पंचशील नगर भागातील भारत विठ्ठल अवचार नामक व्यक्तीने दि १३ जून रोजी शासनाच्या नोटिसचा धसका घेऊन पहाटेच्या वेळी विषारी द्रव प्राशन केले.
त्यांनतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते
मात्र आज दि 17 जून रोजी अखेर भारत अवचार यांची प्राणज्योत मालवली, सादरली घटनेमुळे पंचशील नगर भागातील नागरिकांनी संताप व्यक्त करत जिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता
जोपर्यंत भारत अवचार यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण अंत्यविधी करणार नाही असा पवित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेतला होता.
या घटनेची माहिती मिळताच माजी पालकमंत्री आ.धनंजय मुंडे यांनी तात्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर केली असून सदरील नोटीस संदर्भात अधिक माहिती घेऊन त्याबाबद काय हालचाल करता येईल यावर मी व्यक्त होईल अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली आहे.