बीड : दहावी बोर्ड परीक्षेत तुलसी इंग्लीश स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून या निकालाच्या माध्यमातून तुलसी इंग्लिश स्कूलने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेच्या वतीने दहावी बोर्ड परीक्षेत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा डॉ.प्रियंका रोडे, प्राचार्य उमा जगतकर, प्रशासकीय अधिकारी अस्मिता साळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
तुलसी इंग्लिश स्कूल बीड येथील विद्यार्थी ऋषिकेश कुडके ९०.८० टक्के घेऊन शाळेतून प्रथम आला आहे.प्रवीण कुलगुडे ८७.२० टक्के घेऊन द्वितीय तर पठाण असद ८५.८०.टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. पवार श्रेयस ८५.२० टक्के तर माधुरी अंकुटे हीने ८५.०० टक्के घेऊन टॉप फाईव्ह मध्ये येण्याचा मान मिळविला आहे.
दहावी बोर्ड परीक्षेत तुलसी इंग्लिश स्कूलने यशाची परंपरा राखत उंच भरारी घेतली आहे. या यशाबद्दल देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तुलसी इंग्लिश स्कूलचे सचिव प्रा. प्रदीप रोडे यांनी अभिनंदन केले आहे.तसेच शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.