पुणे : जायभाय पिंपळनेर येथील जवान अशोकराव हाऊसराव गर्जे यांनी पुण्यात वाहतूक पोलिस जमादार पदावर कर्तव्य बजावत असताना पाच लाख रुपयाची सापडलेली बॅग इमाने इतबारे परत केली आहे त्यांच्या या प्रामाणिकपणामुळे अशोकराव गर्जे यांचा अभिमान वाटल्याने नातेवाईक कौतुकाचा वर्षाव करत आहेत,बीड येथील त्यांचे मेहुणे माऊली सानप यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
शुक्रवार दि. १९ मे २०२३ पिंपरी, वाहतुक पोलिसांना नेहमी वादविवादाला सामोरे जावे लागते, वाहतुक पोलिस कायमचा टिकेचा धनी बनत असतो. शिस्त दाखविली तरी टिका आणि कोणावर कारवाई नाही केली तरी टीका केली जाते मात्र निगडी वाहतुक पोलिसांनी आपल्या कामातुन टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.
बँकेत भरण्यासाठी पाच लाख रु घेऊन जात असलेल्या एका डॉक्टर महिलेची हरवलेली बॅग तिला परत करीत आपले कर्तव्य बजावले आहे. हा प्रसंग शुक्रवार (ता.१९) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आकुर्डीतील खंडोबा माळ चौकात घडला आहे. गर्जे यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक राजभरातून केले जात आहे, सदरील डॉ. महिलेने देखील मनस्वी आभार मानले आहेत.