बीड : तालुक्यातील लिंबारुई देवी येथील 60 वर्षीय शेतकऱ्याच्या घरात घुसून रान डुकराणे हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि २२ रोजी घडली आहे.
बाबासाहेब इंदररावं नांदे (रा लिंबारूई देवी) असं जखमी शेतकऱ्याच नाव आहे, विशेष म्हणजे हा हल्ला गावाच्या माध्यभागी आसलेल्या ठिकाणी झाला आहे, हा सगळा प्रकार शेतात झाला असता तर साहजिक होते मात्र गावात दिसवाढवळ्या हा हल्ला होणे म्हणजे आश्चर्यकारक आहे.
घडला प्रकार असा आहे की सकाळची वेळ आणि गावातील लोक झोपेतून उठल्या नंतरची प्रक्रिया करत होतें बाबसाहेब नांदे हे घरात गादीवर झोपलेले होते,
इतक्यात अचानक एक रान डुक्कर आले त्या रानडुकराच्या मागे गावातील कुत्रे लागले आणि ते डुक्कर थेट घरात घुसले आणि घरात घुसलेल्या डुकराने बाबासाहेब नांदे यांच्यावर हल्ला चढवत त्यांना घरातून बाहेर फरफटत आणले त्यानंतर घरातील व्यक्तींनी त्यांना सोडविले, या हल्ल्यात वृद्ध शेतकरी बाबासाहेब नांदे जखमी झाले असून त्याना बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.