बीड : जिल्ह्यातील ४५० तसेच मराठवाड्यातील ३५०० हजार मुस्लिम बंधू-भगिनी हे ७ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून हज यात्रेसाठी प्रस्थान करणार आहेत.
यंदा मुंबई इथून जाणाऱ्या मुस्लिम बंधू-भगिनींच्या पेक्षा जास्त म्हणजे ८७ हजार रुपये अधिकचा खर्च छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळावरून प्रस्थान करणाऱ्या मुस्लिम बंधू-भगिनींना येत आहे. हा अतिरिक्त शुल्क कमी करून समान करावा यासाठी बीड विधानसभा सदस्य आ.संदीप क्षीरसागर यांनी खा. शरद पवार यांची भेट घेतली व यातून मार्ग काढावा अशी विनंती केली, तेव्हा लगेचच शरद पवार यांनी तातडीने याबाबत केंद्रीय हवाई उड्डाण मंत्र्यांशी तसेच तत्सम विभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला व इतर विमानतळांवर जो खर्च येतो त्या पेक्षा अधिक दर छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना लावू नये किंवा अतिरिक्त खर्च केंद्र सरकारने करावा अशी मागणी केली.
हज सारख्या पवित्र यात्रेसाठी जाताना मुस्लिम बंधू-भगिनींना अधिकचा खर्च लागू नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं आ. संदीप क्षीरसागर यांनी म्हंटलं आहे दरम्यान खा.शरद पवार यांची भेट घेतली त्यावेळी माजी आमदार सय्यद सलीम,डॉ. बाबू जोगदंड माझ्या हे ही उपस्थित होते.