मुंबई : राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी पार्टीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे.
त्यानंतर आता माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे म्हणतात ‘आदरणीय पवार साहेब आपण पक्षाध्यक्षाच्या पदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर करताना साठ वर्षांच्या आठवणी सांगितल्यात.
मागील साठ वर्षांच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये देशात अनेक संकटे आली, या संकटांमधून देशाला वाचवण्यासाठी तुम्ही तुमचे योगदान दिले. बऱ्याचदा राष्ट्रीय संकटातून/आपत्तीमधून देशाला तुम्ही वाचवण्याचे काम केले. अशा परिस्थितीत आज देशावर एवढे मोठे संकट असताना तुम्ही पक्षाध्यक्षाच्या पदावरून पायउतार होण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे चुकीचा आहे.
साहेब तुम्ही लोकशाही मानणारे नेते आहात, मग हा निर्णय तुम्ही एकट्याने का घेतला? आपण हा निर्णय मागर घ्यावा, आपला एक कार्यकर्ता या नात्याने विनंती आहे’ अशी प्रतिक्रिया वजा विनती माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी दिली आहे.