बीड : डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड ने दि.२६ मार्च २०२३ रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय महापुरूष सामान्य ज्ञान स्पर्धेत बीड जिल्ह्यातील मधील विविध शाळेतील २५२४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यातून १२८ विद्यार्थी अंतिम परीक्षेस पात्र झाले होते. संयोजन समितीच्या वतीने सदरील विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा रविवार दि. १६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता तुलसी कॉलेज ऑफ आयटी बीड येथे घेण्यात आली. यामध्ये गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग येथील समर्थ विद्यालयाची विद्यार्थिनी राजनंदनी बाबासाहेब डुकरे हीने १०० पैकी ९६ मार्क घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर आष्टी तालुक्यातील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय येथील विद्यार्थिनी वैष्णवी बापूराव कुत्तरवाडे, परळी तालुक्यातील विद्यावर्धिनी विद्यालय येथील विद्यार्थी आदित्य जगन्नाथ वडुळकर, गेवराई तालुक्यातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा धोंडराई येथील विद्यार्थिनी अश्विनी सोमनाथ कोकणे या तिघांनी ९४ मार्क घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तृतीय पारितोषिक ९२ मार्क घेणारे विद्यार्थी गेवराई तालुक्यातील शिवशारदा पब्लिक स्कूल येथील मधुरा सुरेश दाभाडगावकर, माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयातील विद्यार्थिनी साधना कैलास टाकणखार, गेवराई तालुक्यातील समर्थ विद्यालय शिरसमार्ग येथील विद्यार्थी कृष्णा मुकुंद परदेशी, अंबाजोगाई येथील कुंकलोळ योगेश्वरी कन्या विद्यालय येथील विद्यार्थिनी पंकजा रामचंद्र गडदे यांना मिळाले आहे. सदरील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रथम पारितोषिक १० हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक प्रत्येकी २५०० रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक प्रत्येकी १५०० रुपये रोख रक्कम,स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
महापुरुष सामान्य ज्ञान स्पर्धत बीड जिल्ह्यातील धारूर, माजलगाव, परळी, आष्टी, शिरूर, गेवराई, बीड, पाटोदा, वडवणी, आंबेजोगाई, केज तालुक्यातील विविध शाळेतील विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते. यातील १२८ विद्यार्थी अंतिम परीक्षेस पात्र झाले होते. यातून ८ विजेत्या विद्यार्थ्यांची प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक निवड केली गेली. यावेळी संयोजन समितीचे अरूनाताई आठवले, प्रा.प्रदिप रोडे, वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे,प्रा.डॉ.बाबासाहेब हिरवे,प्रा.डॉ.शरद सदाफुले,प्रा.राहुल कांबळे, लक्ष्मीताई सरपते, शैलजा ओव्हाळ, संगीताताई वाघमारे,तानाजी शिनगारे,अशोक ठोकळ,प्रा.राम गायकवाड, प्राचार्य.डॉ.पांडुरंग सुतार, प्रा.डॉ.संजय कांबळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.