बीड : मुंबईची माहीम मस्जिद हाटवल्यानंतर आता माणसेच लक्ष थेट बीडकडे असल्याचे बोलले जात आहे आणि तशी वाटचाल सुद्धा बीड मणसे कडून केली जात आहे.
मागील दोन दिवसापूर्वी माणसे च्या बीडच्या नेत्यांनी ऐका मंदिराचा शोध लावत ते मंदिर अनेक वर्षांपासून विकासापासून दूर आहे ते मंदिर मुस्लिम बहुल परिसरात असून त्याची विटंबना होत आहे तेथील रहिवासी या मंदिरावर अतिक्रमण करत आहेत त्यामुळे हे मंदिर तात्काळ अतिक्रमण मुक्त करावं अशी मागणी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे, तसेच येत्या १५ दिवसात जर यावर मागणीवर प्रशासनाने कारवाई केली नाही तर आम्ही स्वतः त्या मंदिराची साफसफाई करण्याची मोहीम हाथी घेऊ असा ईशारा मणसे नेते अशोक तावरे यांनी दिला आहे.
ते मंदिर की मस्जिद पाहुयात?
ज्या मंदिराचा उल्लेख मनसेने केला ते मंदिर नसून मस्जिद असल्याचे सांगितले जात होते त्यामुळे ‘मराठी महाराष्ट्र’ ने पडताळणीसाठी त्याबाबत माहिती जाणून घेण्यास सुरुवात केली, बीड शहरातील मंदिर मस्जिद बाबद माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही थेट त्या परिसरात गेलो तेथील नागरिकांना विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की हे मंदिर नसून मस्जिद आहे आणि त्या मस्जिदच नाव ‘मस्जिद ऐ कोहनां’ अंजुमन खिला मैदान, बीड ( masjid ye kohna anjuman ) असं आहे.
१९६४/६५ साली याच मुद्यावरून मोठी हिंदू-मुस्लिम दंगल बीडमध्ये झाली होती त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि न्यायलायने याप्रकरणी असं सांगितलं की जे काही आहे ते जैसे थे ठेवा त्यानंतर हा वाद थांबला तेव्हापासून तिथे कोणीही काहीही हालचाल केलेली नाही असे आत्ताही दिसते. तर दुसरीकडे असं सांगितलं जात आहे की याबाबत चे सर्व पुरावे, न्यायालयाने दिलेले ऑर्डर्स वक्फ बोर्डाकडे आहेत असं थेतील जेष्ठ नागरिकांनी सांगितले.
अशी माहिती मिळताच मराठी महाराष्ट्र ने त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जे काही दगडाचे नाक्षीदार बांधकाम आहे ते फार जून असून त्याची मोठ्याप्रमाणात पडझड झालेली आहे पाठीमागून मस्जिद च्या स्ट्रक्चर प्रमाणे ते बांधकाम आहे तर आतमध्ये गेल्यावर काही ठिकाणी पूर्वीच्या काळातीळ दगडावर कोरलेले उर्दू मध्ये लिहिलेले शिलालेख आढळून आले आहेत, ज्या पद्धतीने ते शिलालेख दगडावर कोरलेले आहेत ते आपण चित्रात पाहू शकता त्याच्यानुसार ते कोणताही मंदिर नसून ती फक्त मस्जिद आहे असे स्पष्ट होते.
दरम्यान हे प्रकरणात संवेदनशील असून ‘मराठी महाराष्ट्र’ कडून याप्रसंगी असे आवाहन केले जात आहे की जे काही होईल ते कायदेशीर आणि पुराव्यानुसार होईल यामध्ये दोन समाजात तणाव निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे आणि कायदासुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी दोनीही समाजातील सुजाण नागरिकांनी लोकप्रतिनिधिंनी घ्यावी आणि पोलिसांनी या प्रकरणी योग्य तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करावी.