बीड : गेल्या अनेक वर्षापासून राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून हजारो गरजुवंतांना दिवाळी फराळ वाटप तसेच रमजान ईद निमित्त शिरखुर्मा किट वाटप करण्यात येत आहे. यावर्षी देखील ५०० गरजु कुटूंबांना शिरखुर्मा किटचे वाटप राजयोग फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले. युवानेते, नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिरखुर्मा किट वाटपाची सुरुवात करण्यात आली.
राजयोग फाऊंडेशनचे संस्थापक तथा पर्यटन विकास महामंडळाचे माजी संचालक दिलीप धुत यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरसेवक शुभम धुत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम अविरत सुरू आहे.
कोरोना काळापासून सुरू असलेल्या उपक्रमाचे यंदा ४ थे वर्ष आहे. तसेच २०१७ पासून हजारो गरजू कुटुंबियांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न राजयोग फाऊंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. प्रामुख्याने या उपक्रमाचा उद्देश असा असतो की, श्रीमंतांच्या घरी सण उत्सव मोठ्या उत्साहात थाटात होतात. परंतु गरजुवंतांच्या घरी याची कमतरता जाणवते. याला हातभार म्हणून राजयोग फाऊंडेशन फुलं ना फुलाची पाकळी म्हणून ही मदत करते. हा समाजसेवेचा अविरत रथ इथून पुढे हे कायम असणार असल्याचे राजयोग फाऊंडेशन चे अध्यक्ष, नगरसेवक शुभम धुत यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक इकबाल शेख, आमेर सिद्दीकी, शारेक जकेरिया, नबील जमा, शैलेश नाईकवाडे, शहेबाज शेख, अमर विद्यागर, इकबाल भाऊ, समीर तांबोळी, शुभम कातांगळे, ऋषभ वाघमारे, जयदीप सवाई, गोरख यादव, गिरीश मुंदडा, संजय जावळे, सुग्रीव शिंदे, काशिफ चाऊस, सत्यनारायण करवा, अजिंक्य पगारे, सागर वाव्हुळ, वैभव जाधव, शाकेर इनामदार, अभिनंदन सारडा, अभिजित आव्हाड, यांच्यासह राजयोग फाऊंडेशन चे सदस्य आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.