मुंबई : शरद पवार यांच्या निवासस्थानी गौतम अडाणी आणि शरद पवार यांच्यात गुप्त बैठक झाली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे.
देशात गौतम अडाणी यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते वारंवार आरोप करत आहेत, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अडाणी आणि मोदी यांचा कसा समंद आहे हे सांगितले आणि त्यांना पदावरून हटवले असा आरोप काँग्रेसने केला आहे.
Bjp अडाणी ला मदत करते आहे आणि अडाणी यांनी देशाचं नुकसान केलं आहे, त्यामुळे bjp ला रोखण्यासाठी आता मोठं जनआंदोलन उभारलं पाहिजे आशु भूमिका आता bjp विरोधकांनी घेतलेली आहे, या जनआंदोलनात शरद पवार यांना फार महत्व आहे कारण शरद पवार यांना राष्ट्रीय नेत्यांच्या यादीत चांगल्या ठिकाणी ग्राह्य धरले जाते त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे देशाचं लक्ष आहे.
मात्र शरद पवार सध्या शांत आहेत असे दिसते कारण अडाणी विरोधातील कारवायांच्या मागण्याबाबद त्यांचं मौन आहे शिवाय त्यांचे मागील दोन विधाणं जार पाहिले तर ते अडाणी याना पोषक असणारे आहेत त्यामुळे शरद पवार यांची आणि अडाणी यांची जवळीक वाढली आहे का असं दिसत आहे कारण आज तब्बल दोन तास अडाणी आणि शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजे सिल्व्हर ओक या ठिकाणी झाली.
विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादीच्या किंवा ईतर कोणत्याही नेत्याची उपस्थिती नव्हती शरद पवार आणि अडाणी या दोघांचीच ही भेट होती या भेटीत काय ठरलं? संदर्भात ही भेट होती हे समजु शकले नाही मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.