बीड : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळावरती बीड,परळी, अंबाजोगाई आणि (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर या चार शाखेतून प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर व डॉ.संजय पाटील देवळाणकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आहेत.त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे
नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत नियामक मंडळ सदस्य म्हणून प्राचार्य दीपा भारतभूषण क्षीरसागर आणि डॉ. संजय पाटील देवळाणकर यांचा विजय झाला आहे, त्यांना प्रत्येकी 570 मतं मिळाले आहेत, त्यांनी औरंगाबादच्या उमेदवाराचा दारुण पराभव केलेला आहे, त्यांना फक्त शंभर मतं मिळवता आली .
छत्रपती संभाजी नगर ,अंबाजोगाई, आणि बीड येथे मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज मुंबई येथे विजयी उमेदवारांची घोषणा निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी यांनी केली.
संपूर्ण महाराष्ट्र आणि बेळगाव मधून साठ नियामक मंडळ सदस्य परिषदेवर निवडून आले आहेत यातून पुढील कार्यकारणी लवकरच तयार होईल.
मराठवाड्यातील पाच जागांपैकी तीन जागांसाठी निवडणूक संपन्न झाली त्यामध्ये बीडमधून प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर आणि डॉ. संजय पाटील देवळाणकर यांना घवघवीत यश मिळाले आहे.
अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, परळी शाखेचे अध्यक्ष बाजीरावभैया धर्माधिकारी,अंबाजोगाईच्या संपदा कुलकर्णी, बीड येथील,डॉ.उज्वला वनवे, प्रदीप मुळे,योगेश पवार, डॉ. अनिता शिंदे,मिलिंद शिवनीकर,प्रेषित रुद्रवार, शैलेश देशमुख,आनंद टाकळकर ,सय्यद अमजद, प्रा. न.पु.काळे,प्रा.हनुमंत खेत्री लक्ष्मीकांत दोडके यांनी प्रचंड मेहनत घेतली.
या यशाबद्दल मा.जयदत्त अण्णा क्षीरसागर,डॉ. भारतभूषण क्षीरसागर , राजकिशोर मोदी,बाजीराव धर्माधिकारी,भरत लोळगे, डॉ.दिलीप घारे, डॉ.जयंत शेवतेकर,श्रीकांत उमरीकर,कुलदीप धुमाळे,डीएस कुलकर्णी, विद्यासागर पाटांगणकर,डॉ. गणेश चंदनशिवे डॉ. योगेश क्षीरसागर डॉ सारिका क्षीरसागर डॉ. आबासाहेब हंगे, डॉ. विश्वास कंधारे, प्राचार्य राजपांगे,प्राचार्य आवारे,डॉ शिवानंद क्षीरसागर,डॉ शिवाजी शिंदे, डॉ सतीश माऊलगे,जालिंदर कोळेकर,सय्यद लाल , चारही शाखेच्या कलावंतांनी, मतदारांनी अभिनंदन केले आहे.