बीड प्रतिनिधी | तालुक्यातील पाली जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत बोरफडी येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य बैठक संपन्न झाली. या बैठकीत बप्पासाहेब घुगे यांचा गेल्या निवडणुकीत थोड्या मताने पराभव झाला असला तरी या होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी करण्याचा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक वर्ग, तसेच महिलांनी ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.बप्पासाहेब घुगे हे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारे नेते असल्याने त्यांच्याविषयी जनतेत विशेष आत्मीयता आहे, असेही मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले. ग्रामविकासाच्या दिशेने घुगे यांचे नेतृत्व सक्षम असून, ते जनतेच्या मनात घर करून आहेत, असे मत या बैठकीत मांडण्यात आले. शेवटी सर्व उपस्थित ग्रामस्थांनी “बप्पासाहेब घुगे यांना निवडून देऊ, विकासाचा संकल्प पूर्ण करू” असा नारा देत निवडणूक लढाईसाठी एकजूट दाखवली.

















