माजलगाव / बीड : आगामी नगर परिषद ननिवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि स्थानिक पातळीवर नेत्यांनी जोरदार तयारी सुरू आहे, इच्छुक उमेदवारांच्या रांगा मुलाखती देण्यासाठी पक्ष कार्यालयापुढे लागल्या आहेत. विविध पक्षाच्या नेत्यांनी नगर परिषद आपल्या कशी येईल यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. त्यासाठी बळ, पैसा, राजकीय खेळी, जनतेला आश्वासनं, आमिष, दाखवून ही निवडणूक लढवली जाणार आहे असे चित्र सध्या आहे. मागच्या काळात चर्चेचा विषय बनलेली माजलगाव नगर परिषद निवडणूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, आ. प्रकाश सोळंके यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेत असताना इच्छुकांना तुझ्याकडे किती पैसे आहेत? असे सवाल करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे सामान्य व्यक्तीला थारा दिला जात नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर ज्या इच्छुक उमेदवाराची दारू, मटण, पैसे वाटण्याची ताकत आहे त्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे चित्र आहे.
मतदारांचे प्रश्न सोडविणारा नको पैसे खर्च करणारा हवा
मागील काही दिवसापूर्वी कार्यकर्ता बैठकीत आमदार प्रकाश सोळुंके यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता त्या व्हिडीओ च्या माध्यमातून प्रकाश सोळंके यांनी इच्छुक उमेदवारांची लायकी काढली होती.
निवडणूक लढवण्याची खूप दारू गोळा लागतो लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्यामुळे इच्छुकांनी उमेदवारी मागताना आपल्याकडे दारूगोळा अर्थात पैसे किती लाख आहेत विचार करवा ज्याचा वापर निवडणुकीत चपटी मटण, लक्ष्मी म्हणून करता येईल त्यासाठी प्रचंड पैसा लागेल. काम करणारा, लोकांचे प्रश्न सोडविणारा, वीज, स्वच्छता, पाणी पुरवणारा काही कामाचा नाही ज्याच्याकडे पैसे त्याला उमेदवारी मिळणार मग त्याने काम नाही केले तरी चालेल. आणि निवडणुकीत लाखांची उधळण केल्यावर वसूल कुटून करायचे? तर निधी घशात घालायचा आणि विकासाचे तीन तेरा वाजवायचे, ही नवी परंपरा आमदार प्रकाश सोळंके यांनी जन्माला घातली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मतदारांनो तुम्हाला कचरा समजणाऱ्या लबाडांना दारात उभा राहू देऊ नका
गेली कित्येक वर्ष या आलटून-पालटून या प्रस्थापितांच्या ताब्यात नगर परिषद राहिलेली आहे. आरक्षण कोणत्याही कोणतेही जाहीर झाले तर कोणत्या ना कोणत्या मार्गाने हे धनदांडगे सत्तेच्या खुर्चीवर बसतात आणि स्वतःची जहागिरी असल्यासारखे वागतात.
काही ठराविक ठिकाणची थातूरमातून कामे करायची आणि ईतर ठिकाणी मात्र काहीच कामे करायची नाहीत, ईतर ठिकाणी भेदभाव करायचा हे पूर्वीचे समीकरण आहे. शहरातील मागासवर्गीय, मुस्लिम, शोषित पिढीताना किंमत द्यायची नाही, त्यांना सुविधा द्यायच्या नाहीत, त्यांच्या वार्डातील नाल्या काढायच्या नाहीत, निर्जंतुकीकरणासाठी कधी फवारणी करायची नाही, पाणी वेळेवर सोडायचे नाही, वीज व्यवस्थित पुरवठा करायची नाही, कार्यालयीन किरकोळ कामे करायची नाहीत अशा ऐक ना अनेक समस्या शहरातील ठराविक नागरिकांच्या असतात त्या कधीही सोडविल्या जात नाहीत. त्यांना फक्त मतदारांच्या यादीत संख्या मोजण्यासाठी गृहीत धरले जाते, ते कवडीमोल किंमतीत विकले जातात त्यांचे काय विशेष नाही असे म्हणून त्यांची लायकी काढायची शेवटी दोन जसे प्रकाश सोळंके म्हणाल तसे शेवटच्या दोन दिवसात शे दोनशांचे मटण आणि चापटी द्यायची आणि त्यांच्याकडून पाया पडून मतदान घ्यायचं आणि पुन्हा पाच वर्षे डंकून पहायचं नाही अशी ह्या प्रस्थापितांच्या नियत आहे.
त्यामुळे गोरगरीब मतदारांनो ऐक किलो मटण आणि ऐका चापटीवर विकू नका तुमचे आरोग्य ह्या चापटीमुळे आहे, तुमचे कुटुंब ह्या दारूमुळे उध्वस्त झाले आहे त्याला अगोदर सावरा. जो कोणी मत मागायला येईल त्या निर्भिडपणे जाब विचारा, तो वर्षभरात तुमच्या सोईसुविधा पुरवेल असे बाँड पेपरवर लिहून घ्या. कोणत्याही उमेदवाराकडून पैसे घेऊ नका, ३०० रुपयांत पाच वर्ष विकले जाऊ नका लोकशाही बळकट करा.
निवडणूक आयोगाने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे
याच निवडणुकीच्या अनुषंगाने आ. प्रकाश सोळंके यांनी दारू गोळा कसा लागतो याची जाहीरपणे कार्यकर्त्यांना माहिती दिली होती, जर ते अशाप्रकारे जाहीर दारूगोळा, पैसे, वाटण्याची भाषा बिनधास्त करत असतील तर प्रत्यक्षात ते काय करत असतील याची कल्पना निवडणूक आयोगाने करावी आणि डोळ्यात तेल घालून दारू, पैसे वाटून निवडणुका लढविणाऱ्या आमदाराला कायदा दाखवला पाहिजे अशी मागणी जनतेची आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने कोण तक्रार करत नाही, कोणी काही बोलत नाही म्हणून ह्या बेकायदेशीर वागणाऱ्या पुढाऱ्यांना मोकळीक देऊ नये देहात कायदा आहे हे दाखवून द्यावं, निवडणूक आयोग पारदर्शक आहे हे दाखवून द्यावे आणि डोळ्यात तेल घालून अशा भ्रष्ट प्रथा करणाऱ्या नेत्यांवर नजर ठेवून राहिले पाहिजे अशीही मागणी केली जात आहे.

















