बीड (प्रतिनिधी): आगामी बीड नगर परिषद निवडणूक 2025 पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे बीड शहरातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि.11 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन,बार्शी रोड,बीड येथे होणार असून या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बीड शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.
बीड : आगामी बीड नगर परिषद निवडणूक २०१५ पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) तर्फे बीड शहरातील कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बीड नगर पालिकेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन,बार्शी रोड,बीड येथे होणार असून या बैठकीस आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आणि अन्य वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नगर परिषद निवडणुकी संदर्भातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा होणार आहे. बीड शहरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे आ.संदीप क्षीरसागर यांनी केले आहे.