सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट वायरल होत आहे. निर्मला यादव नावाच्या सोलापुरातील एका महिलेने देवेंद्र फडणवीस यांना मी तुम्हाला पसंत करू लागले आहे, माझं उर्वरित आयुष्य हे तुमच्या चरणी आहे, तुम्ही जे स्थान द्याल ते मी प्रेमाने स्वीकारेल, या पुढचा आयुष्य तुम्हाला समर्पित आहे असं त्या महिलेचा म्हणणं आहे.

ही महिला आहे तरी कोण?
तर मागील 2022 साली सोलापूर जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख आणि निर्मलाबाई यादव यांचा हॉटेल मधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. आणि त्यानंतर राज्यात खळबळ उडाली . श्रीकांत देशमुख यांनी आपल्या सोबत लग्न करतो अशा प्रकारचं आमिष दाखवून आपली फसवणूक केली असल्याची तक्रार निर्मला यादव यांनी दिली होती, त्यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता कालांतराने जामीन मंजूर झाला आणि ते प्रकरण तसच रेंगाळत राहिलं. त्यानंतर दीर्घकाळ निर्मला यादव यांनी सोशल मीडियावर येऊन मदतीची याचना केली, विरोधी पक्ष नेत्यांसोबत उपस्थित राहून न्याय मागण्याची भूमिका निभावली मात्र न्याय मिळाला नाही. आजपर्यंत सोशल मीडियावर कधी गप्प राहून तर कधीही स्पष्ट व्यक्त होऊन निर्मला यादव यांनी वेळोवेळी न्याय मागितला मात्र निर्मला यादव यांना न्याय मिळतच नसल्यामुळे त्यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांना साकडे म्हणून ही पोस्ट केली असावी असा अंदाज लावला जात आहे. वास्तवात निर्मला यादव यांच्या मनात काय चालले आहे याबद्दल कल्पना नाही. दरम्यान यानंतर भारतीय जनता पार्टी आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेणार? काय उत्तर देणार?याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे. मात्र निर्मला यादव यांच्या या पोस्टमुळे विरोधकांना एक चांगले कोलीत मिळालं असल्याची चर्चा आहे.
