गणेश तांबे | पिंपळनेर
बीड तालुक्यातील पिपळनेर ग्रामपंचायत गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात चर्चेत राहिलेली ग्रामपंचायत आहेत. तत्कालीन सरपंच आणि अंतर्गत कलहाच्या राजकारनाणे गावातील नागरिक त्रस्त झाले होते. गेली तीस वर्षे लोक गावच्या विकासाची आतुरतेने वाट पाहत आहेत मात्र तो विकास दाखवणारा सुरू पिंपळनेर गावात अद्याप उगवला नाही यांची खंत प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. निवडणूका येतात- जातात सत्ता येते- जाते विकास मात्र नेमका काय असतो हे कोणताही पुढारी दाखवू शकलेला नाही हे भयाण वास्तव आहे. गावच्या विकासाचे तर सोडा इथे लाखोंचा भ्रष्टाचार केला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पिंपळनेर ग्रामपंचायतीत सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत विविध विकास कामांच्या नावाखाली जवळपास ६६,०१,९८९/- रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अनियमिततेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद बीडच्या पंचायत समितीने याची गंभीर दखल घेतली असून, ५ सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे.
उपलब्ध कागदपत्रांनुसार, सोलर सिस्टीम, फर्निचर, नाल्या आणि ब्लॉक बांधकामाच्या खरेदीमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विविध बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उचलला गेला असून, अनेक खरेदी प्रक्रिया आणि कामांची पारदर्शकता संशयास्पद असल्याचे दिसून येते.
फक्त सोलर सिस्टीमसाठीच ३३,११,९९८/- रुपये खर्च दर्शवले गेले आहेत.
गावातील नाल्यांच्या कामासाठी १४,२३,२००/- रुपये खर्च दाखवले गेले असून, त्यातही एकाच कामासाठी वेगवेगळ्या दिवशी रक्कम उचलण्यात आली आहे.
याशिवाय फर्निचर खरेदी, वस्तू व वॉटर फिल्टर खरेदी, गावांतर्गत पथदिवे बसविणे यासाठी लाखो रुपये खर्च झाल्याचे नोंद आहे.
या पार्श्वभूमीवर पंचायत समिती बीडचे गट विकास अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असून, समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हे आहेत चौकशी समितीचे सदस्य
1. श्री. नांदेडकर एस. आर.
2. श्री. भंडारे एम. एन.
3. श्री. माने एस. एम.
4. श्री. गवळी एस. ए.
5. श्री. बडे यू. डी.
हाभ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार सुनिल चंद्रकांत जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी (अजित पवार) कीसान सभा यांनी केली आहे आणि या तक्रारीची दखल घेत पंचायत समितीने ही कारवाई केली आहे.
ग्रामपंचायत पिंपळनेर ता.जि.बीड यांनी वित्त आयोगातून उचलेली रक्कम
फर्निचर खरेदी जि.प.शाळा 4,99,445/- सोलर खरेदी जि.प.शाळा 99,000/- वस्तु व फिल्टर खरेदी अंगणवाडी 3,84,998/- फर्निचर खरेदी प्रा.आ. केंद्र
49,900/- गावांतर्गत पथदिवे बसविणे 4,00000 गावांतर्गत नाली बांधकाम 8,73,800/- गावांतर्गत नाली बांधकाम 1,38,000/- गार्वातर्गत नाली बांधकाम , सोलर बसविणे पाणी पुरवठा 11,48,474/- सोलर बसविणे पाणी पुरवठा 21,63,524/- गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे 1,11,380/- गावांतर्गत पेव्हर ब्लॉक बसविणे 1,62,068 एकुण 66,01,989/- इतका निधि खर्च झाल्याचे दाखवले.