सोलापूर : तालुक्यातील बोरामणी गावाच्या शिवारातील ऐका विहिरीत पोहायला गेलेले 5 जण पाण्यात बुडाले असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
यामधील दोघांना बाहेर ककाढण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह अग्निशमन दल, तहसीलदार घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी संगप्पा कांबळे यांनी माहिती दिली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात आज गुरुवारी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
कडाक्याच्या उन्हापासून बचावासाठी गावातील ५ ते ६ मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते.
विहिरीत ही मुले पोहत असताना अचानक विहिरीचे कडे कोसळले आणि पाहणारी मुले बुडाली त्यातील दोघांना बाहेर काढले मात्र इतर मुले पाण्यात अडकली असल्याची माहिती मिळाली आहे.
सदरील विहीर ही चिऱ्यांना बांधलेली असल्याने दरड कोसळल्याप्रमाणे सर्व दगड आणि माती विरहित पडली आहे त्यामुळे तळ अदृष्य झाला आहे. दरम्यान अग्निशन दल ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य करत आहे.