बीड : जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंचाने शिवाजी महाराज जयंतीला परवानगी देण्यासाठी बाँड पेपर मागितला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. नेमका प्रकार काय आहे हे या बातमीमधून आपण जाणून घेणार आहोत. तालुक्यातील चुंबळी गावच्या सरपंच रेश्मा पोळ यांनी स्टॅम्प पेपरची मागणी का? केली हा सवाल उपस्थित झाला आहे.
हा नेमका काय प्रकार आहे? काय आहे सत्यता?
१९ फेब्रुवारी रोजी शिवाजी महाराज जयंती जगभर साजरी केली जाते तशीच जयंती या दिवशी चुंबळी गावांमध्ये तीन दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले आहे. १९,२०,२१ या तीन दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत याचीच परवानगी मागण्यासाठी शिवजयंती समितीच्या काही लोकांनी रीतसर अर्ज करून ग्रामपंचायतकडे केला होता.
मात्र चुंबळी गावात यापूर्वी स्थानिकचे राजकरण पुढे आणत मागील काही महिन्यापूर्वी ग्रामपंचायत सरपंचाच्या कुटुंबीयांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते. तशा प्रकारचे राजकारण पुन्हा होऊ नये काही वाद निर्माण होऊ नयेत म्हणून आणि असे प्रकार अजूनही होऊ शकतात त्यामुळे जबाबदारी म्हणून जे काही वाद होतील त्याला ग्रामपंचायत जबाबदार राहणार नाहीत, त्याला समिती जबाबदार राहिली किंवा जे कोणी दोषी असतील ते जबदार राहतील असे म्हणणारा बाँड करून द्या असे आम्ही सबंधित जयंती समितीला सांगितले होते. त्यांवरून हा वाद सुरू झाला असल्याचे सरपंच यांनी मराठी महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.
सरपंच रेश्मा पोळ आणि यांनी असेही म्हटले की आम्ही शिवाजी महाराज यांचे मावळे आहोत विशेषता आम्ही सुद्धा मराठा आहोत त्यामुळे आम्हालाही जयंतींबद्दल आदर आणि प्रेम आहे. सोशलमिडियावर जाणीवपूर्वक बदनामीकारक मचकूर फिरवून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे असे त्या म्हणाल्या.
मागील काही दिवसांपूर्वी जयंती स्वतः ग्रामपंचायत साजरी करणार होती मात्र गावात दोन गट असल्याने सरपंच भाऊ यांना अध्यक्ष करू नका असा एक गट म्हणाला आम्हाला आमच्या मर्जीचा अध्यक्ष करायचा आहे. त्यावर एका व्यक्तीचे नावही सुचवले मात्र सरपंच यांनी मध्यस्थी मार्ग काढत दोनही नको आपण तिसरा कोणीतरी सर्वानुमते अध्यक्ष करू असे ठरले मात्र ते सुद्धा विरुद्ध गटाने मान्य केले नाही त्यामुळे हा वाद पुढे आणला जातोय. आमचा जयंतील अजिबात विरोध नाही मात्र काही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून ही मागणी केली होती असेही सरपंचाने सांगितले आहे.
दरम्यान चुंबळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीन सर्व शिवप्रेमीना आवाहन आहे अफवांवर विश्वास ठेऊ नका कोणती मेसेज शहानिशा केल्याशिवाय फॉरवर्ड करू नका अशी विनंती व आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचाय सरपंच यांनी याप्रकरणी पोलिसांनी हे प्रकरणं हाताळावे अशी मागणी करणे गरजेचे आहे. कारण वादविवाद पोलिस मिळवतील, परवानगी पोलिस देतील, आणि द्यायची की नाही परिस्थिती पाहून पोलिस परवानगी देतील हा वाद जास्त वाढू नये यासाठी पोलिसांना कळवले पाहिजे असे मराठी महाराष्ट्र चे मत आहे.