बीड : योगेश तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गुण आहेत. लोकांच्या प्रश्नांची जाण तुला आहे. आपल्या वडीलांप्रमाणेच तू सुध्दा जनसेवेत स्वतःला वाहून घेशील, याची मला खात्री आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. त्यांनी या संबंधी एक व्हिडिओ आपल्या स्वतःच्या अकाऊंटवरून पोस्ट करीत अशा प्रकारे डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यावर कौतुकाची थाप दिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
डॉ.योगेश क्षीरसागर हे सध्या बीड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तिकिटावर उभे आहेत. एकवर्षभरापुर्वी डॉ.योगेश क्षीरसागर यांनी अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत करीत बीडमध्ये पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच आज पवार यांनीही बीडची जागा शिवसेनेच्या कोट्यातून सोडवून घेत डॉ.योगेश क्षीरसागर यांना इथे संधी देण्याचा निर्णय घेतला. बीड मतदारसंघात आज डॉ.योगेश क्षीरसागर यांच्यासाठी अनुकूल वातावरण आहे. उच्चशिक्षीत, फ्रेश, तरूण तडफदार चेहरा मैदानात असल्याने राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते देखील डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी झपाटून कामाला लागलेले आहेत.
काय आहे अजितदादांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत?
अजितदादांना पोस्ट केलेल्या व्हिडिओत डॉ.योगेश क्षीरसागर अजितदादांविषयी बोलत आहेत. ते म्हणतात, “दादांचे वर्क डिसीप्लीन आहे. दिलेला शब्द पाळण्याचे काम ते करतात. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात प्रत्येक काम दर्जेदार होते. दादा त्यावर चांगल्या प्रकारे मॉनीटरिंग करतात. दादांशी आमच्या वडीलांचे पारिवारीक संबंध होते. पण मगील पाच-सात वर्षे माझी आणि त्यांच्याशी कसलीच भेट नव्हती किंवा काही बोलणे देखील नव्हते. दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना शुभेच्छा द्यायला त्यांच्या बंगल्यावर गेलो. त्यावेळी वाटले दादा आपल्याला ओळखणार नाहीत. पण नाही, दादांनी मला ओळखले. मी त्यांना म्हणालो, दादा तुमच्यासोबत काम करायला मी उत्सूक आहे. त्यांनी मला जवळ बोलावून घेतले. त्यानंतर दादांनी मला नंतर भेट म्हणून सांगितले. तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर मला माझ्या वडीलांचा फोन आला. त्यांनी मला विचारले ‘तू अजितदादांना भेटला का?’ मी म्हणालो ‘हो, पण हे तुम्हाला कोणी सांगितले?’ त्यावर वडील म्हणाले, ‘मला दादांचा फोन आला होता’. मला आश्चर्य वाटले. दादांची मी बर्याच वर्षानंतर भेट घेणं, तरीही दादांनी मला ओळखणं, त्यांनी माझ्या वडीलांना फोन करणं, त्यांची काम करण्याची ही टेक्नीक मला फार आवडली. त्यामुळे कधीच आम्ही दादाला विसरू शकत नाहीत”, असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी या व्हीडिओत म्हटलेले आहे. याच व्हिडिओला दादांनी ‘योगेश तुझ्याकडे उत्कृष्ट लोकप्रतिनिधी बनण्याचे गूण आहेत’, असे कॅप्शन दिले आहे.